ढगांच्या कळांमुळे द्राक्षांना झळा!

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 9 फेब्रुवारी 2018

कलेढोण - जिल्ह्यात ढगाळ वातावरण आणि पावसाच्या हलक्‍या शिडकाव्यामुळे द्राक्ष, शाळू उत्पादक शेतकरी वर्ग चिंतेत पडले आहेत. 

कलेढोण परिसरात सुमारे ७०० ते ८०० एकर निर्यातक्षम द्राक्षांचे उत्पादन घेतले जात आहे. त्यासाठी शेतकरी पोटच्या पोरांप्रमाणे द्राक्ष पिकाची काळजी घेत असतो. वाढणारी थंडी, ढगाळ वातावरण, शेतीच्या पाण्याची कमतरता, वटवाघळ व मधमाश्‍यांचा बागांवर हल्ला आदी अनेकविध नैसर्गिक संकटांना शेतकरी तोंड देतो. या अगोदर पडलेल्या खराब हवामानामुळे फळ छाटण्या यंदा लवकर झाल्या नाहीत. त्यामुळे काही शेतकऱ्यांच्या बागा उशिरा जाणार आहेत.

आता ढगाळ हवामानामुळे द्राक्षांत भुरी व मण्याला तडा जाण्याची स्थिती निर्माण झालेली आहे. यंदा कलेढोण, विखळे, मुळीकवाडी, पाचवड, गारळेवाडी, तरसवाडी, गारुडी, कानकात्रे, मायणी, निमसोड भागातील शेतकऱ्यांना द्राक्ष निर्यातीस प्रति किलो दर १६७ रुपये ते ६६ रुपये असा मिळाला आहे. नजीकच्या काळात वातावरण खराब राहिल्यास दलालांकडूनही त्यातही घट होण्याची शक्‍यता व्यक्त होत आहे. तर दुसरीकडे रब्बी हंगामातील ज्वारीचे क्षेत्र यंदा चांगले बहरून आले आहे. सध्या काढणीचा व खोडणीचा हंगाम जोरात सुरू असून, शेतकऱ्यांची धांदल सुरू आहे. काहींची आगाप ज्वारी काढणी पूर्ण झाली असली तरी कडबा बांधणी व गोळा करण्याची कामे अपूर्ण आहेत. त्यातच कालच्या ढगाळ हवामानामुळे व हलक्‍या सरींमुळे हातातोंडाशी आलेले पीक वाया तर जाणार नाही? असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे.

Web Title: kaledhon news satara news grapes climate