खटावमधील तलाव अद्याप कोरडेच

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 30 ऑक्टोबर 2017

कलेढोण - अपुऱ्या पावसामुळे खटाव तालुक्‍याच्या पूर्व भागातील तलावांत पाणीसाठा खूप कमी झाला आहे. मायणी तलाव तर कोरडा पडला असून, कलेढोण, विखळे, पाचवड, गारुडी, कानकात्रे तलावांत अपुरा पाणीसाठा झाल्याने शेतकरी चिंतेत आहेत. गावागावांतील हे पाणवठे न भरल्याने ग्रामस्थांना पिण्याच्या पाण्यासाठी पुन्हा भटकंती करावी लागणार आहे.

तालुक्‍याच्या पश्‍चिम भागामध्ये यावर्षी पुसेसावळी, औंध, पुसेगाव, नेर, डिस्कळ भागात समाधानकारक पाऊस झाल्याने शेतकरीराजा समाधान व्यक्त करीत आहे. असे असताना पूर्व भागातील मायणी, कलेढोण, विखळे, पाचवड, मुळीकवाडी, गारुडी, कानकात्रे, गारळेवाडी येथे पावासाने समाधानकारक हजेरी न लावल्याने शेतकरी चिंतेत आहेत. रोहित पक्ष्यासाठी प्रसिद्ध असलेला मायणीचा ब्रिटिशकालीन तलाव गेल्या चार-पाच वर्षांपासून पूर्ण क्षमतेने भरला नाही. यावर्षी तर तो कोरडा पडला असून, कानकात्रे, कलेढोण, कटकाळी तलावात ४० टक्के पाणीसाठा झाला आहे. तर विखळे, मुळीकवाडी, गारुडी भागातील तलावांतही अपुरा पाणीसाठा झाला आहे. त्यामुळे पूर्व भागातील शेतकरी शेतीच्या पाण्याने तर ग्रामस्थ भविष्यात उद्भवणाऱ्या पिण्याच्या पाणीप्रश्नाने चिंतीत आहेत. आजवर झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांनी शेतात पिके घेतली आहेत. सध्या ही पिके बहरात असताना आता त्यांना पाण्याची गरज आहे. मात्र, विहिरींत पुरेसा पाणीसाठा उपलब्ध नाही. तालक्‍यातील शेतीला आजही शाश्वत पाणीपुरवठा उपलब्ध झालेला नाही. तो करण्यास प्रशासन व राजकीय नेते असमर्थ ठरले आहेत. जनता मात्र, पिण्याच्या व शेतीच्या पाण्याची प्रतीक्षा करत आहे.

Web Title: kaledhon satara news khatav lake empty