'कोरोनामुळं ज्यांचा मृत्यू झाला, त्या लोकांना डॉक्टरांनी मारलं'

Kalicharan Maharaj
Kalicharan Maharajesakal
Updated on
Summary

'अनेकजण हिंदू धर्मासाठी काम करणं सोडून जातीसाठी माती खाण्याचा उद्योग करीत आहेत.'

सांगली : कोरोना (Coronavirus) हा फर्जीवाडा आहे. जागतिक आरोग्य संघटनासुद्धा (World Health Organization) फर्जीवाडा संस्था आहे. त्यांचे डॉक्टर, वैज्ञानिक आणि कर्मचारी हे फर्जी आहेत. देशातील हिंदू हा भाषावाद आणि जातीयवादावर विभागला आहे. परंतु, संपूर्ण देशावर राज्य करायचं असेल, तर सर्व हिंदुंनी त्याग केला पाहिजे. सर्व हिंदू एक होवून देशावर हिंदुचे राज्य करण्यासाठी हिंदू व्होट बँक तयार करून देशाचे हिंदूकरण होणे गरजेचं आहे, असे प्रतिपादन कालीपुत्र कालीचरण महाराज (Kalicharan Maharaj) यांनी केले. ते सांगलीत प्रसार माध्यमांशी बोलत होते.

कोरोना हा भयानक महामारी नाही. ज्या कोरोनामुळं लोकांचा मृत्यू झाला, त्या लोकांना डॉक्टरांनी (Doctor) मारलं आहे. किडनी आणि मानवी शरीरातील अवयवांची तस्करी झालेली आहे, असा धक्कादायक आरोपही कालीचरण महाराजांनी केलाय. ते पुढे म्हणाले, देशासह जगावर हिंदू राष्ट्र (Hindu Rashtra) व्हावं, अशी छत्रपती शिवाजी महाराज यांची इच्छा होती. परंतु, सध्या हिंदू हा भाषावाद आणि जातीवादावर विभागाला आहे. तो एक होणं गरजेचं आहे. जगात सनातन हिंदू धर्म हाच श्रेष्ठ आहे. परंतु, हिंदू धर्मात काही विघटक आहेत. त्यांना साफ करणं गरजेचं आहे.

Kalicharan Maharaj
जलमंदिरला कालीचरण महाराजांची भेट; राजमाता कल्पनाराजे, उदयनराजेंशी चर्चा

अमेरिकेत रेमडिसिव्हरवर बंदी आहे, तर भारतात हे इंजेक्शन का दिलं गेलं. कोरोना हे एक षडयंत्र आहे. देशातील सर्व हिंदू एक करून देशातील राजकीय व्होट बँक तयार केली पाहिजे. देशात विकास पाहिजे आणि आता तो पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) करीत आहेत. त्यांना आमचा पाठिंबा राहणार आहे. यासाठी इतिहासात हिंदूवर झालेला अन्याय पटवून देणे आवश्यक आहे. परंतु, अनेकजण हिंदू धर्मासाठी काम करणं सोडून जातीसाठी माती खाण्याचा उद्योग करीत आहेत, असंही ते म्हणाले.

Kalicharan Maharaj
लग्नानंतर देवदर्शनला न जाता नवदाम्पत्य थेट उदयनराजेंच्या दर्शनाला

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

MD Drugs Replace Gang Rivalries: Organized Crime Network Tightens Grip in Western Maharashtra
Anjali Vetal from Karad wins bronze medal at U-15 Asian Wrestling Championship in Thailand
Wildlife rescuer trapped by rat snake
Why are Sangli farmers opposing the Shaktipeeth Highway?
Marathi News Esakal
www.esakal.com