पडाल आत्महत्येप्रकरणी दोघांवर गुन्हा

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 22 मे 2018

सोलापूर - राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त मराठी चित्रपट "म्होरक्‍या'चे निर्माते कल्याण पडाल (वय 38) यांनी खासगी सावकाराच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केल्यानंतर या प्रकरणी दोन सावकारांविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल झाला आहे. कल्याण पडाल यांच्या पत्नी रेणुका पडाल यांनी याबाबत फिर्याद दिली होती. कर्करोगामुळे पडाल यांची प्रकृती खूपच बिघडली होती. त्यांनी उपचारासाठी सावकारांकडून व्याजाने पैसे घेतले होते. पैशासाठी सावकारांनी त्रास देण्यास सुरवात केली होती. त्यामुळे पडाल यांनी आत्महत्या केली होती. या दोन्ही सावकारांची शोध सुरू आहे.
Web Title: kalyan padal suicide case crime