रयत विज्ञान परिषदेत 'कल्याणी'चा झेंडा

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 4 जानेवारी 2019

नागठाणे - नवी मुंबईतील डॉ. होमी भाभा विज्ञान संस्थेतर्फे आयोजित रयत विज्ञान परिषदेत साताऱ्यातील अण्णासाहेब कल्याणी विद्यालयाने बनविलेल्या मजूर ट्रॉली या संकल्पनेची निवड झाली. माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी या संकल्पनेची माहिती घेत विशेष कौतुक केले.

नागठाणे - नवी मुंबईतील डॉ. होमी भाभा विज्ञान संस्थेतर्फे आयोजित रयत विज्ञान परिषदेत साताऱ्यातील अण्णासाहेब कल्याणी विद्यालयाने बनविलेल्या मजूर ट्रॉली या संकल्पनेची निवड झाली. माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी या संकल्पनेची माहिती घेत विशेष कौतुक केले.

रयत शिक्षण संस्थेकडून राज्यभरात तीन वर्षांनी रयत विज्ञान परिषद आयोजिली जाते. यंदा नवी मुंबईतील डॉ. होमी भाभा विज्ञान केंद्रातर्फे या परिषदेचे आयोजन करण्यात आले. त्यात अण्णासाहेब कल्याणी विद्यालयाने मजूर ट्रॉली ही अभिनव संकल्पना मांडली. मनीषा भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली समीर सुनील शेडगे व शिवम सुनील डेरे या विद्यार्थ्यांनी त्याचे सादरीकरण केले. शरद पवार यांनी स्वतः या संकल्पनेची माहिती घेऊन सर्वांचे कौतुक केले. 

'रयत'चे चेअरमन डॉ. अनिल पाटील, पुण्यातील सायन्स ऍण्ड टेक्नोलॉजी पार्कचे महासंचालक डॉ. राजेंद्र जगदाळे, मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुहास पेडणेकर यांनीही या संकल्पनेची माहिती घेतली.डॉ. कुमार बॅनर्जी यांच्या हस्ते समीर, शिवम तसेच सौ. भोसले यांचा पाच हजार रुपये, सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र, विज्ञान संच तसेच कर्मवीर ग्रंथ देऊन गोरव करण्यात आला. विभागीय अधिकारी के. एम. महामुनी, विद्यालयाचे मुख्याध्यापक विलासराव महाडिक, सो. एम. जे. राऊत, दीपक महापरळे, संजय घाडगे, ए. बी. गायकवाड आदींनी अभिनंदन केले. विद्यालयाच्या गौरी चव्हाण, शिक्षिका सौ. जे.पी. पाटील यांनाही पारितोषिके मिळाली.

विज्ञान परिषदेचे उपक्रम
लहान वयातच विद्यार्थ्यांत विज्ञानाची गोडी निर्माण व्हावी, त्यांच्यातील संशोधनवृत्तीस चालना मिळावी या हेतूने विज्ञान परिषद आयोजिण्यात येते. या परिषदेत तज्ज्ञ, शास्त्रज्ञांची व्याख्याने, चर्चासत्रे, प्रयोग, शोधनिबंध, कार्यशाळा आदी उपक्रम आयोजिण्यात आले. राज्यातून तीन हजार विद्यार्थी व शिक्षक या परिषदेत सहभागी झाले होते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Kalyani flag of the Ryan Science Conference