बेळगाव जिल्ह्यातील सर्व जागांवर कमळ फुलवू - बी. एस. येडियुराप्पा

आगामी विधानसभा निवडणुकीत बेळगाव जिल्ह्यातील १८ विधानसभा मतदारसंघामध्ये ‘कमळ’ फुलेल.
BS Yeddyurappa
BS Yeddyurappa sakal
Summary

आगामी विधानसभा निवडणुकीत बेळगाव जिल्ह्यातील १८ विधानसभा मतदारसंघामध्ये ‘कमळ’ फुलेल.

बेळगाव - आगामी विधानसभा निवडणुकीत (Vidhansabha Election) बेळगाव जिल्ह्यातील (Belgaum District) १८ विधानसभा मतदारसंघामध्ये (Vidhansabha Constituency) ‘कमळ’ (Kamal) फुलेल. सर्व जागा जिंकण्याचे उद्दिष्ट ठेवून पक्षातील मतभेद बाजूला ठेवावेत. ही निवडणूक एकसंघपणे लढावी, अशी सूचना माजी मुख्यमंत्री बी. एस. येडियुराप्पा (B. S. Yediyurappa) यांनी केली.

भाजप कार्यकारिणीची सभा मंगळवारी (ता. १२) बेळगावात झाली. त्यावेळी येडियुराप्पा बोलत होते. कोणतीही गोष्ट लपविण्यासारखी नाही. छोट्या-मोठ्या तक्रारी होत्या, त्या दूर केल्या आहेत. सगळ्यांना एकत्र आणत संघटीतपणे काम करण्याबाबतच्या सूचना केल्या आहेत.

पक्षातील भेदभाव संघटनेला बाधक आहेत. त्यासाठी १८ विधानसभा मतदारसंघांमध्ये पक्षाचे उमेदवार जिंकणे खूप महत्वाचे आहे. त्यामुळे सगळ्यांनी मिळून एकदिलाने काम करण्याच्या सूचना केल्या आहेत, अशी माहिती येडियुराप्पा यांनी दिली. यापुढेही बेळगावचा नियमित दौरा करणार आहे. दर महिन्याला पालकमंत्री गोविंद कारजोळ यांच्यासह खासदार, आमदारांची बैठक घेऊन मतभेद मिटविले जातील, असेही त्यांनी सांगितले.

बैठक निम्म्यावर; पुन्हा आगमन

माजी पालकमंत्री रमेश जारकीहोळी हे बैठक निम्म्यावर सोडून निघून गेल्याची चर्चा बैठकस्थळी होती. मात्र, प्रत्यक्षात तसे घडले नाही. जारकीहोळी तेथून एका कामानिमित्त बाहेर पडले. मात्र, थोड्या वेळाने ते परत बैठकस्थळी आले. त्यामुळे चर्चेला पूर्णविराम मिळाला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com