esakal | कामेरीच्या आख्खा मसुराची चवच न्यारी; पण गिऱ्हाईक येईना दारी
sakal

बोलून बातमी शोधा

कामेरीच्या आख्खा मसुराची चवच न्यारी; पण गिऱ्हाईक येईना दारी

कामेरीच्या आख्खा मसुराची चवच न्यारी; पण गिऱ्हाईक येईना दारी

sakal_logo
By
दिलीप क्षीरसागर

कामेरी : आख्खा मसुराची चवच न्यारी... (akkha masur) वाळवा तालुक्यातील (walva) ढाब्यांची ख्याती महाराष्ट्रभर भारी..पण या कोरोनाच्या महामारीत महामार्गावरील सुमारे चाळीस हॉटेल व धाबे व्यावसायिकांची आर्थिक कुचंबना झाली आहे. अशिया राष्ट्रीय महामार्गावर (natinal highway) सांगली जिल्ह्याच्या (sangali district) हद्दीतील कासेगाव ते कणेगाव या ३१ किलोमीटर अंतरामध्ये जवळपास चाळीस हॉटेल व धाबे आहेत. या धाब्यावर मोठ्या प्रमाणात आख्खा मसूर शिजवला जातो. कामेरी गाव (kameri) हे आख्खा मसूर साठी महाराष्ट्रभर (maharashtra) प्रसिद्ध आहे. शासनाने या लॉकडाऊन काळात हॉटेल ढाबे सुरू करण्यास परवानगी दिली आहे.

मात्र गिऱ्हाईकांना हॉटेलमध्ये जेवणाचा आस्वाद घेण्यास परवानगी नाही. व्यावसायिकांना पार्सल देण्याची सुविधा सुरू करण्यास परवानगी मिळाली आहे. सकाळी १२ ते दुपारी ४ व रात्री ७ ते रात्री ते ९ पर्यंत ही सुविधा दिली जाते. मात्र सध्या या कोरोनामुळे राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक ही मोठ्या प्रमाणात रोडावली आहे. त्यामुळे वाहन चालकांनी या ढाब्याकडे पाठ फिरवली आहे. स्थानिक गिऱ्हाईक येत होते ते पण आता बंद झाले आहे. करोनाचे रुग्ण आढळल्याने गाव पातळीवर गाव बंदीचे आदेश असल्याने लोक आता जेवणासाठी बाहेर पडत नाहीत. त्यात पार्सल सुविधा असल्याने बरेच जण येत नाहीत. सध्या या हॉटेल मधून २५ टक्के व्यवसाय होत आहे. व्यावसायिकांना मोठ्या प्रमाणात याचा आर्थिक फटका बसला आहे.

हेही वाचा: मिरज नगरीला गांजाचा विळखा; विक्री वाढली तरी पोलिसांचे दुर्लक्ष

महामार्गावरील हॉटेलची खासियत

या मार्गावर सांगली जिल्ह्याचे असणाऱ्या कासेगाव ते कणेगाव पर्यंत चाळीस हॉटेल व धाबे असून यामध्ये आख्खा मसूर, चिकन थाळी, बिर्याणी व तांबडा पांढरा, मटण थाळी, तर शाकाहारी हॉटेल मध्ये मिक्स व्हेज, काजू करी, पनिर हे मेनू आहेत; मात्र यातील ५० टक्के धाब्यावर मसूर शिजतो आहे, पण खवय्यांची गर्दी नाही.

"कोरोनामुळे आम्हा व्यावसायिकांना मोठ्या प्रमाणात आर्थिक फटका बसला आहे. पार्सल सुविधा असल्याने लोकांचा फारसा प्रतिसाद मिळत नाही. त्यात हॉटेलमध्ये कामगार मोठ्या प्रमाणात आहेत. त्यातील काही कामगार बसून आहेत. त्यांना पगार द्यावा लागतो आहे, तरी शासनाने लवकरात लवकर निर्णय घेऊन पूर्ण क्षमतेने हॉटेल व धाबे सुरू ठेवण्यास परवानगी द्यावी."

- अविनाश शिंदे, व्यवस्थापक -एम. के. धाबा विठ्ठलवाडी

हेही वाचा: स्पर्धा परीक्षेला राम राम ठोकत शेखरने गाव गाठलं अन् झाला कोट्याधीश

loading image