esakal | मिरज नगरीला गांजाचा विळखा; विक्री वाढली तरी पोलिसांचे दुर्लक्ष
sakal

बोलून बातमी शोधा

मिरज नगरीला गांजाचा विळखा; विक्री वाढली तरी पोलिसांचे दुर्लक्ष

मिरज नगरीला गांजाचा विळखा; विक्री वाढली तरी पोलिसांचे दुर्लक्ष

sakal_logo
By
प्रमोद जेरे

मिरज : वैद्यकीय पंढरी म्हणुन लौकिक असलेली मिरज नगरी (miraj) आता सहजपणे मिळणाऱ्या गांज्याच्या विळख्यात सापडली आहे. विक्रेत्यांची संख्या भरमसाठ नाही म्हटले तरी पोलिस (police) यंत्रणेचे ब-यापैकी दुर्लक्ष होत असल्याचे चित्र असून, शहरासह ग्रामीण भागातही (villege) गांज्या विक्री करणाऱ्यांची संख्या वाढत चालली आहे. अगदी गल्लीबोळातही गांजा उपलब्ध होतोय, हे वास्तवच याची भयानक परिस्थिती दर्शवणारी आहे. याचा परिणाम समाज आणि कुटूंब व्यवस्थेवर होतोय याकडे कोणाचेही लक्ष नाही. (sangli district )

सध्या गांज्याच्या नशेसाठी किंवा नशेमध्ये तरुणांकडून घडणारे किरकोळ गुन्हे भविष्यात घातक ठरू शकतात. पोलिसांच्या कारवाया हा यावरील आता उपाय राहिलेला नाही तर घराघरातील पालक आणि गल्लीबोळातील नेते, कार्यकर्त्यांना या समस्येकडे प्राधान्याने लक्ष द्यावे लागणार आहे. अन्यथा सध्या शेजा-याच्या घरातील हे दुखणं कधी स्वतःच्या घरात येईल हे कळणार देखील नाही. तरुणाई वाचवण्यासह गुन्हेगारी रोखण्यासाठी गांज्याची तस्करी रोखावीच लागेल. त्यासाठी सामुहीक प्रयत्न गरजेचे बनले आहेत.

हेही वाचा: स्पर्धा परीक्षेला राम राम ठोकत शेखरने गाव गाठलं अन् झाला कोट्याधीश

"गांजाची अवैध विक्री करणाऱ्या अनेक विक्रेत्यांवर गेल्या वर्षाच्या तुलनेने यावर्षी भरीव कारवाया झाल्या आहेत. अनेक गांजा विक्रेत्यांविरुद्ध हद्दपारीची कारवाई केली आहे; परंतु पोलिसांच्या या कारवायांना सामान्य जनतेची साथ मिळाल्यास अधिक प्रभाव दिसेल. शिवाय हा अवैध व्यवसाय करणाऱ्यांवर दबाव राहील. नागरिकांनी उत्स्फूर्तपणे अशा अवैध गांजा विक्री करण्याऱ्यांची नावे मला स्वतःला जरी कळवली तरी चालतील. गांजा विक्रेत्यांची माहिती देणाऱ्याचे नाव गुपित ठेवले जाईल."

- अशोक वीरकर, पोलिस उपअधिक्षक, मिरज

अनेक विक्रेते बनलेत प्रस्थ....

शहरात अनेक गांजा विक्रेते म्हणजे एक प्रस्थ बनले आहे. त्यांना नेहमीप्रमाणे राजकीय संरक्षण आहे, यापैकी शहरात एक ‘गुरुजी’ नामक विक्रेत्याने तर आपली गांजा विक्रीची स्वतंत्र व्यवस्थाच निर्माण केली आहे. गरजू आणि नेहमीच्या व्यसनाधीन तरुणांना त्यांच्याकडून गांजा घरपोच होतो. हा गांजा पोहोचवणारी मुलेही साधी सायकल घेऊन जातात, जेणेकरून कारवाई झाली, तर केवळ सायकल जप्त होते.

"सध्या तरुणाईमध्ये गांजाचे व्यसन वाढते आहे. वर्तणूक बदलणे, झोप न येणे, असबंद्ध बडबड, भास होणे, स्वभाव चिडखोर, संशयास्पद वृत्ती बळावणे, ही गांजाच्या व्यसनाधिन झालेल्यांची लक्षणे असतात. बहुसंख्य तरुण हे केवळ मित्रांचा दबाव किंवा कुतूहलापोटी या व्यसनाकडे वळतात. हे प्रमाण वाढते आहे. हे रोखण्यासाठी सामूहिक प्रयत्न हवेत."

- डॉ. राजकिरण साळुंखे, सहयोगी प्राध्यापक, मानसोपचारतज्ज्ञ, मिरज

हेही वाचा: पुरुषी मक्ता मोडत उंदरवाडीच्या कांबळे मावशींच्या अनोख्या धाडसाचं होतयं कौतुक

"तरुणांमधील गांजाच्या व्यसनाने सध्या सामाजिक स्वास्थ्य बिघडते आहे. गांजाचे व्यसन हे अन्य व्यसनांच्या तुलनेत स्वस्त आहे. सहजगत्या उपलब्ध होणारा गांजा अल्पशिक्षित तरुणाईलाच नव्हे तर उच्च शिक्षीतानांही संकटाच्या खाईत लोटत आहे. त्यासाठी गावागावातील गल्लीबोळात गांजा विकणाऱ्यांना नागरिकांनी पकडून पोलिसांच्या ताब्यात द्यावे आणि त्यांच्यावर कठोरात कठोर कारवाई करण्यास भाग पाडावे."

- तानाजी कागवाडे, सामाजिक कार्यकर्ता, मिरज

येथे होतेय गांजाची विक्री....

 • रेल्वे स्थानक परिसर

 • कोल्हापूर रेल्वे पुलाखाली

 • मिरज-म्हैसाळ रस्ता

 • मालगाव रोड

 • मार्केट परिसर

 • मिरज बस स्थानकाची मागील बाजू

 • मार्केट ते बसस्थानक रस्ता

हेही वाचा: Corona Update: देशात गेल्या 24 तासांत 44 हजार 459 कोरोनामुक्त

दृष्टिक्षेप...

 • गांजाची कर्नाटकासह जत तालुक्यातून मोठ्या प्रमाणात आवक

 • आवक आणि विक्रेते वाढल्याने गांजाच्या दर घसरला

 • फुटकळ कारवायांमुळे विक्रेते, पुरवठादारांना भीती नाही

 • अल्पशिक्षितांंपेक्षा उच्चभ्रूंमध्ये वाढते आकर्षण

 • व्यसनमुक्ती केंद्रात गांजाने व्यसनाधिन झालेल्यांची

 • संख्या अधिक

loading image