महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने सलग तिसऱ्या दिवशी कर्नाटक मार्गावरील सुमारे सहाशेहून अधिक फेऱ्या रद्द केल्या. बेळगावसह कर्नाटकच्या विविध भागांत सुमारे वीस हजारांहून अधिक प्रवासी रोज प्रवास करतात.
निपाणी : चित्रदूर्ग येथे झालेल्या घटनेमुळे सोमवारी (ता. २४) दुसऱ्या दिवशीही लांब पल्ल्यासह आंतरराज्य मार्गावरील बससेवा बंदच (Interstate Bus) होती. आंतरराज्य बसच्या दोन्ही परिवहन महामंडळांच्या सुमारे बाराशे फेऱ्या रद्द झाल्या. त्यामुळे बसस्थानकातील महाराष्ट्र फलाट मोकळेच पडले होते. तर इतर फलाटांवरही प्रवासी, मजूर, विद्यार्थी व कामगारांची वर्दळ कमी दिसत होती.