माजी विद्यार्थी संघटनेच्या अध्यक्षपदी कांतीलाल आटपाडकर यांची निवड

रुपेश कदम
मंगळवार, 7 ऑगस्ट 2018

संघटनेची बैठक राज पार्क दत्त मंदिर या ठिकाणी संघटनेचे प्रमुख मार्गदर्शक आयकर विभाग मुंबईचे अप्पर आयुक्त नितीन वाघमोडे, राज प्रोसेस पुणेचे व्यवस्थापकीय संचालक तथा संघटनेचे माजी अध्यक्ष विजयराज पिसे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली.

मलवडी : यशवंतराव चव्हाण हायस्कूल माजी विद्यार्थी सामाजिक संघटना वरकुटे मलवडी या संघटनेच्या अध्यक्षपदी कांतीलाल आटपाडकर यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.

संघटनेची बैठक राज पार्क दत्त मंदिर या ठिकाणी संघटनेचे प्रमुख मार्गदर्शक आयकर विभाग मुंबईचे अप्पर आयुक्त नितीन वाघमोडे, राज प्रोसेस पुणेचे व्यवस्थापकीय संचालक तथा संघटनेचे माजी अध्यक्ष विजयराज पिसे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. सदर बैठकीत संस्थापक सदस्य राजेश शिंगाडे, डॉ. बाळासाहेब ढेरे, विजय पिसे व कांतिलाल आटपाडकर यांनी संघटनेच्या ध्येय्य धोरणांविषयी आपली मते मांडली. शाळेच्या कालबध्द विकासाचा आराखडा तयार करण्यात  आला. संघटनेच्या दिवाळी कार्यक्रमाविषयी चर्चा करण्यात आली.

त्यानंतर संघटनेची नविन कार्यकारिणी सर्वानुमते निवडण्यात आली. कार्यकारिणी पुढीलप्रमाणे : प्रमुख मार्गदर्शक - नितिन वाघमोडे (अप्पर आयकर आयुक्त), अध्यक्ष - कांतीलाल आटपाडकर (सर), कार्याध्यक्ष - सुरेश जाधव (वरिष्ठ पोलिस निरीक्षक), सह कार्याध्यक्ष - सतीश जगताप, शांताराम जाधव, उपाध्यक्ष - छगन पिसे, विजय जगताप (माजी सरपंच), सुनील थोरात (माजी चेअरमन), सचिव - अनिकेत आटपाडकर (मुंबई पोलिस), सह सचिव - शहाजी बनगर (सर), खजिनदार - अर्जुन यादव, सह खजिनदार:- गणेश खंदारे, प्रसिद्धी प्रमुख - बापूसाहेब मिसाळ, सिद्धार्थ सरतापे. संघटनेमधील इतर कार्यकारणी सदस्य हे मागील वर्षीचे कायम करण्यात आले आहेत. नवीन पदाधिकाऱ्यांचे शिक्षक व ग्रामस्थांनी अभिनंदन केले.

 

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

Web Title: Kantilal Atpadkar elected as a president of Student Alumni Association