कऱ्हाड नगरपालिका; इच्छाशक्तीअभावी आराखडा कागदावर!

कऱ्हाड नगरपालिका; इच्छाशक्तीअभावी आराखडा कागदावर!

पार्किंग, वाहनतळ, कोंडी सोडवण्याच्या पातळीवर पाच वर्षांत साफ अपयश
कऱ्हाड - शहरातील वाढती वाहतुकीची कोंडी व वाहनतळाबाबत पाच वर्षांत कोणताही ठोस निर्णय झाला नाही. पोलिसांनी केलेल्या सूचनांवरही कोणताही निर्णय घेता आलेला नाही. पोलिसांनी पालिकेस दाखल केलेला वाहतुकीचा प्रारूप आराखडाही मासिक किंवा स्थायी समितीच्या बैठकीत चर्चेत घेण्यात आला नाही. त्यामुळे पार्किंग, वाहनतळ, वाहतुकीच्या कोंडी सोडवण्याच्या पातळीवर पाच वर्षांत साफ अपयश आल्याचेच दिसते. पाच वर्षांत दोन वेळा पोलिसांनी त्यांचा वाहतूक आराखडा सादर केला. मात्र, पालिकेने एकदाही त्याचा गांभीर्याने विचार केला नाही.

शहरातील मुख्य बाजरपेठेसह अंतर्गत भागात अरुंद रस्ते आहेत. छोट्या गल्लीबोळातील स्थिती व वाढत्या वाहनांची संख्या लक्षात घेवून वाहतूक आराखड्याचे नियोजन होण्याची गरज आहे. मात्र, निव्वळ पालिकेतून निराशाजनक स्थिती असल्याने तो आराखडा लालफितीत अडकल्याची
पाच वर्षांतील स्थिती आहे. पोलिसांनी दोन वेळा वाहतूक आराखडा पालिकेस सादर केला. त्यावर काहीच विचार पालिकेतून करण्यात आला नाही. मागील महिन्यात पोलिसांनी सगळ्या स्थितीचा विचार करून वाहतुकीचा आराखडा सादर केला. त्यावर काहीच हालचाल झालेली नाही.

मुख्याधिकारी विनायक औंधकर यांच्याकडे सादर झालेला आराखडा त्यांनी नगराध्यक्षांकडे ठेवला होता. पोलिसांनी आराखडा दाखल केल्यानंतर मासिक व तीन स्थायी समितीच्या बैठका झाल्या. त्यावर काहीच चर्चा झाली नाही. त्यामुळे आराखडा कागदावरच राहिला. आराखडा मंजुरीसाठी लागणारी राजकीय इच्छाशक्ती कमी पडल्याने तो गुंता जटिल बनल्याचेच दिसते. पाच वर्षांत रिक्षा थांबे वाढले आहेत. मंजूर रिक्षा थांब्यांपेक्षा दुप्पट रिक्षा थांबे शहरात आहेत. त्यामुळे वाहतूक कोंडी वाढत आहे. त्या सगळ्यावर कोणीही काहीही बोलण्यास तयार नाही. अनेक रिक्षा थांबे रस्त्यावर आहेत. त्यांचा विचार होण्याची गरज आहे. त्यासाठी पालिकेने पुढाकार घेण्याची गरज होती. तो विचार झालेला दिसत नाही.

शहरातील एकाही शाळाबाहेर व सिग्नल व्यवस्थेलगत झेब्रा क्रासिंगचे पट्टेही पालिकेने आखलेले नाहीत. सिग्नल यंत्रेणाची वेगळीच स्थिती आहे. त्याची देखभालही नीट होताना दिसत नाही. त्याचे टायमिंगही व्यवस्थित नाही. शहरात दोन ठिकाणी सिग्नल यंत्रणा पूर्वी होती. मात्र, पाच वर्षांत आणखी एका ठिकाणी सिग्नल वाढवला. मात्र, त्याची अंमलबजावणी होताना दिसत नाही. शहरातील विविध ठिकाणी वाहतूक कोंडी होते, त्या ठिकाणी एकेरी मार्ग करण्याची मागणी पोलिसांनी केली आहे. त्यावर ठोस निर्णय झाल्याचे दिसत नाही. केवळ एका ठिकाणी एकेरी मार्ग झाला. वाहनतळ ठरवण्याचा निर्णयही मागे पडल्याचे दिसते.

सम-विषम पार्किंगचा प्रश्नही अनुत्तरित
शहरातील अंर्तगत रस्त्यावर सम-विषम पार्किंग करण्याचा प्रश्नही अनुत्तरित आहे. त्याचा विषय सोडवता आलेला नाही. मोठ्या वाहनांसाठी वाहनतळ ठरवण्याचीही प्रक्रिया अपूर्णच राहिलेली दिसते. वाहतुकीच्या दृष्टीने सगळ्याच पातळीवर पालिका काहीही करू शकलेली नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com