प्रशासनाची तयारी कऱ्हाडला अंतिम टप्प्यात

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 5 सप्टेंबर 2017

कऱ्हाड - विसर्जन मिरवणुकीसाठी पालिकेची तयारी अंतिम टप्प्यात आहे. नदीपात्रातील पाणी ओसरल्याने पात्रात मुरूम टाकण्यात आला. दरम्यान, मिरवणुकीतील वाहनांच्या परतीच्या मार्गावर पाणी असल्याने पालिका व पोलिसांसमोर वाहतूक कोंडीचे आव्हान आहे.  पालिकेने विसर्जन मार्गावर पुरेशा प्रकाशासाठी दिवे बसवण्याचे काम केले आहे.

कृष्णा घाटावरही मोठ्या प्रमाणात दिवे बसवण्यात आले आहेत. काही दिवसांपूर्वी बांधकाम विभागाने विसर्जन मार्गावरील खड्डेही बुजवले आहेत. यंदा चावडी चौकात एकच पालिकेचे स्वागत कक्ष उभारले जाणार आहे. नदीपात्रातील पाणी ओसरल्याने तसेच मिरवणुकीतील वाहनांच्या परतीच्या मार्गावर अद्यापही पाणी असल्याने पालिकेने नदीपात्रात आज मुरूम पसरला. मिरवणुकीतील वाहने तेथे उभी करून त्याचे पालिसांतर्फे नियोजन करून पात्राकडे व पात्राच्या वरती सोडण्याचे नियोजन करावे लागणार आहे. दरम्यान, घरगुती विसर्जनासाठी कृष्णा घाटासह कृष्णा नाका, पी. डी. पाटील उद्यान, दत्त चौक, शिवाजी सोसायटी, कोयनेश्वर घाट, मार्केट यार्ड गेट क्रमांक एक समोर आदी ठिकाणी जलकुंड तयार करण्यात आली आहेत. विविध ठिकाणी निर्माल्यासाठी पाच ट्रॅक्‍टरची सोय केली आहे.

विसर्जनासाठी...
पाणी ओसरल्याने नदीपात्रात मुरूम पसरला 
निर्माल्य कलशांसह वाहनांची सोय 
विसर्जन मिरवणूक मार्गावर ३२ मोठे दिवे 
घरगुती विसर्जनासाठी सात जलकुंडांची सोय

Web Title: karad news administrative preparation in final step