तिरंगी लढतीची शक्‍यता

हेमंत पवार
गुरुवार, 28 सप्टेंबर 2017

कऱ्हाड - तालुक्‍यातील नेत्यांच्या गटांची प्रतिष्ठा पणाला लावणाऱ्या ४४ ग्रामपंचायतींची रणधुमाळी सध्या जोरदार सुरू आहे. गावची सत्ता आपल्याच ताब्यात राहावी, यासाठी गावपुढाऱ्यांनी वाट्टेल ते प्रयत्न सुरू केले असून, त्यासाठी पै-पाहुण्यांचीही मदत घेण्यात येत आहे. निवडणूक लागलेल्या बहुतांश गावांत दुरंगी तर मोठ्या गावांत चुरस असल्याने तेथे तिरंगी लढतीची चिन्हे आहेत. त्यातच सरपंचपदासाठी थेट निवडणूक होणार असल्यानेही गावागावांमध्ये शेरास सव्वाशेर शोधून त्यास उमेदवारी देण्याची चढाओढ सुरू आहे. मात्र, वाढलेली चुरस स्थानिक गटांच्या नेत्यांसह पुढाऱ्यांसाठी डोकेदुखी ठरत आहे.  

कऱ्हाड - तालुक्‍यातील नेत्यांच्या गटांची प्रतिष्ठा पणाला लावणाऱ्या ४४ ग्रामपंचायतींची रणधुमाळी सध्या जोरदार सुरू आहे. गावची सत्ता आपल्याच ताब्यात राहावी, यासाठी गावपुढाऱ्यांनी वाट्टेल ते प्रयत्न सुरू केले असून, त्यासाठी पै-पाहुण्यांचीही मदत घेण्यात येत आहे. निवडणूक लागलेल्या बहुतांश गावांत दुरंगी तर मोठ्या गावांत चुरस असल्याने तेथे तिरंगी लढतीची चिन्हे आहेत. त्यातच सरपंचपदासाठी थेट निवडणूक होणार असल्यानेही गावागावांमध्ये शेरास सव्वाशेर शोधून त्यास उमेदवारी देण्याची चढाओढ सुरू आहे. मात्र, वाढलेली चुरस स्थानिक गटांच्या नेत्यांसह पुढाऱ्यांसाठी डोकेदुखी ठरत आहे.  

तालुक्‍यातील ग्रामपंचायतींचा हा मोठा टप्पा पार पडत आहे. त्यासाठी प्रशासकीय यंत्रणेकडून कार्यवाही सुरू आहे. तालुक्‍यातील मोठी आणि संवदेनशील ग्रामपंचायत म्हणून ओळख असलेल्या वडगाव हवेली ग्रामपंचायतीसाठी जिल्हा परिषदेचे माजी सदस्य जगदीश जगताप यांच्या विरोधात त्यांचे बंधू 

जिल्हा परिषदेचे माजी सदस्य जयवंत जगताप यांच्यासाठी पृथ्वीराज चव्हाण, माजी मंत्री विलासराव पाटील-उंडाळकर, भाजपचे चिटणीस अतुल भोसले व मोहिते गट एकत्र येण्याची चिन्हे असून, त्यादृष्टीने व्यूहरचना आखण्यात आली आहे. महाराष्ट्र केसरी संजय पाटील यांचे गाव म्हणून परिचित असणाऱ्या आटके ग्रामपंचायतीसाठी मोहिते, भोसले आणि पृथ्वीराज चव्हाण गटाविरोधात उंडाळकर आणि अविनाश मोहिते गट एकत्र आला आहे. त्यामुळे तेथे चुरस निर्माण झाली आहे. व्यसनमुक्त गाव म्हणून ओळख निर्माण केलेल्या रेठरे खुर्द ग्रामपंचायतीसाठीही मोठी चुरस असून तेथे भोसले गटाच्या विरोधात चव्हाण, उंडाळकर आणि मोहिते गट उभे ठाकतील, अशी चिन्हे आहेत. स्वातंत्र्यसैनिकांचे गाव म्हणून जिल्ह्याला परिचित असलेल्या दुशेरे गावातही भाजपचे चिटणीस अतुल भोसले यांचे समर्थक पंचायत समितीचे माजी सदस्य आणि कृष्णा कारखान्याचे संचालक धोंडिराम जाधव यांच्या विरोधात उंडाळकर, मोहिते, अविनाश मोहिते गट एकत्र येऊन सत्ता खेचण्यासाठी प्रयत्न करतील. गोंदी ग्रामपंचायतीमध्ये उंडाळकर आणि भोसले गट एकत्र येऊन तेथे अविनाश मोहिते, मदनराव मोहिते गटापुढे आव्हान उभे करतील, असे सध्याचे चित्र आहे. कृष्णा कारखाना कार्यक्षेत्रातील जुळेवाडी ग्रामपंचायतीसाठी भोसले आणि मोहिते गटाविरोधात अविनाश मोहिते गटाचे कार्यकर्ते हे एकमेकांविरोधात उभे ठाकतील असे चित्र आहे. उंडाळकरांच्या बालेकिल्ल्यातील येळगाव ग्रामपंचायतीसाठी उंडाळकर गटाविरोधात अतुल भोसले गटाच्या कार्यकर्त्यांनी ताकद आजमावण्याचे प्रयत्न सुरू केले असून, तेथे दुरंगी लढत होईल. आणे ग्रामपंचायतीसाठी भोसले गटाविरोधात चव्हाण, उंडाळकर, मोहिते गट एकत्र येऊन लढतील, असे चित्र असल्याने तेथे दुरंगी लढत होईल. कुसुर ग्रामपंचायतीसाठीही चुरस वाढल्याने तेथे दुरंगी किंवा तिरंगी तर पंचायत समितीचे माजी सभापती प्रदीप पाटील यांच्या तारुख गावामध्येही दुरंगी लढतीची चिन्हे आहेत.  

कऱ्हाड उत्तरमधीलही ग्रामपंचायतींच्या रणधुमाळीसाठी वातावरण तापलेले आहे. पाणी योजनेवरून रान तापलेल्या तळबीड ग्रामपंचायतीसाठी भावकीवर पॅनेल पडतील असे चित्र असून तेथे तिरंगी लढतीचे चिन्हे आहेत. सरपंचपद खुले असल्याने तेथे पॅनेलच्या उमेदवारांसह अपक्षांचीही मोठी चुरस पाहायला मिळेल. जलयुक्त शिवारमध्ये चांगले काम करणाऱ्या किवळ गावामध्येही निवडणूक होण्याची चिन्हे आहेत. तेथे राष्ट्रवादी 
काँग्रेस आणि काँग्रेस पक्षाच्या समर्थकांमध्ये लढत होईल असे दिसते. जुने कवठे येथे राष्ट्रवादी काँग्रेस अंतर्गतच दोन गटांत स्वतंत्रपणे आणि काँग्रेसचा गट अशी तिरंगी लढत होण्याची चिन्हे आहेत. मात्र, तेथे काँग्रेसचे समर्थक राष्ट्रवादीच्या एका गटाशी हातमिळवणी करतील, अशीही शक्‍यता वर्तवण्यात येत आहे. राजकीयदृष्ट्या संवेदनशील असणाऱ्या कालगाव ग्रामपंचायतीसाठी काँग्रेसअंतर्गतच दोन स्वतंत्र गट आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा गट अशी तिरंगी लढतीची शक्‍यता आहे. मात्र, तेथेही जागा वाटपावरून पुढील वाटाघाटी ठरतील. सिमेंट साखळी बंधाऱ्यांसाठी प्रसिद्ध असणाऱ्या शामगावमध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपच्या समर्थकांमध्ये तिरंगी लढतीची शक्‍यता आहे. चरेगावध्येही तीच स्थिती असून तेथे राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि भाजप अशी लढत होईल असे दिसते. 

कऱ्हाड तालुक्‍यातील मोठ्या ग्रामपंचायतींपैकी एक असणाऱ्या सुपने ग्रामपंचायतीचीही निवडणूक होत आहे. ती बिनविरोध करण्यासाठी सर्वच पातळ्यांवर प्रयत्न करण्यात आले. मात्र, जागा वाटपात तेथील नेत्यांचे फिस्कटल्याने तेथे निवडणूक लागण्याची शक्‍यता असून तेथे दुरंगी लढत होईल, असे सांगण्यात येत आहे. 

बिनविरोधचा डंका कायम?
विधान परिषदेचे आमदार आनंदराव पाटील यांचे गाव म्हणून जिल्ह्याला परिचित असणाऱ्या विजयनगर ग्रामपंचायतीची निवडणूक मागील वेळी बिनविरोध करण्यात आली. ती याही वेळेस बिनविरोध करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळे त्यांची बिनविरोधची परंपरा कायम राहणार का? याबाबत सर्वांनाच उत्सुकता लागून आहे.

Web Title: karad news grampanchyat election