सरकारने लोकांना बेरोजगार केले; उद्योग बंद पडले: पृथ्वीराज चव्हाण

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 24 ऑक्टोबर 2017

सर्व आघाडीवर सरकारचे निर्णय अपयशी ठरत आहे. नाशिक महानगरपालिकेच्या प्रचाराला मी गेलो होतो त्यावेळी मला कळले लोकांच्या भावना सरकारच्या विरोधात आहेत. जातीयवादी पक्षाला तेथील मतदारानी थारा दिला नाही. मतदार काँग्रेसच्या झेंड्याखाली ऐकवटला आहे हिच परिस्थिती ग्रामपंचायतीच्या निवडणुकीच्या निकालावेळी दिसुन आली आहे

कोपर्डे हवेली (ता. कऱ्हाड, जि. सातारा)  - सरकारने नोटा बंदी करुन अनेक लोकांना बेरोजगार केले तर अनेक उद्योग बंद पडले, अशी टिका माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी केली.

कोपर्डे हवेली गटातील व मसुर गटातील गावात जाऊन आमदार श्री. चव्हाण यांनी ग्रामस्थ आणि काँग्रेसचे नवनिर्वाचित सरपंच सदस्य यांच्याशी संवाद साधला. त्यात शाहापुर, नडशी, मसुर, अंतवडी, वाघेरी आदि गावांचा सामावेश होता. यावेळी कऱ्हाड उत्तरचे काँग्रेसचे धैर्यशिल कदम, जिल्हापरिषद सदस्य निवास थोरात, माजी जिल्हा परिषद सुदाम दीक्षीत, माजी पंचायत सदस्य भिमराव डांगे, गणेश नलवडे, शैलेश चव्हाण, दादासाहेब चव्हाण, निवास पाटील, शिवाजी चव्हाण, डी. एस. काशीद, विवेक चव्हाण आदि उपस्थित होते. वाघेरी गावातील जोर्तिलींग गणेश मंडळ, नुर बाबा युवा मंच, संदीप कदम युवा मंच यांच्या संयुक्तपणे दीपावलीच्या शुभेच्छा आणि फराळाचे अयोजन करण्यात आले होते. 

यावेळी पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, सरकारने नोटा बंदी करुन अनेक लोकांना बेरोजगार केले तर अनेक उद्योग बंद पडले. चुकीच्या निर्णयामुळे देश अर्थिक संकटात सापडला आहे. झालेल्या चुका मान्य करण्याऐवजी सरकार चुकीचे निर्णय घेत आहे. जी एस टी ची अमलबजावणी योग्य प्रकारे केली नाही. शेतकऱ्यांना वार्यावर सोडले आहे. अनेक मंत्र्यावर भ्रष्टाचाराचे आरोप होवुन कोणीही राजीणामा दीला नाही. सर्व आघाडीवर सरकारचे निर्णय अपयशी ठरत आहे. नाशिक महानगरपालिकेच्या प्रचाराला मी गेलो होतो त्यावेळी मला कळले लोकांच्या भावना सरकारच्या विरोधात आहेत. जातीयवादी पक्षाला तेथील मतदारानी थारा दिला नाही. मतदार काँग्रेसच्या झेंड्याखाली ऐकवटला आहे हिच परिस्थिती ग्रामपंचायतीच्या निवडणुकीच्या निकालावेळी दिसुन आली आहे. काँग्रेस पक्षाला चांगले यश मीळाले आहे. यावेळी धैर्यशिल कदम, निवास थोरात यांची भाषणे झाली. कार्यक्रमास वडोली निळेश्वर, अंतवडी, नडशी कोपर्डे हवेली, शामगाव आदि गावातील नवनिर्वाचित सदस्य उपस्थित होते.

Web Title: karad news: prithwiraj chavan