हद्दपारीनंतर गुंडांच्या टोळ्या आता ‘मोका’च्या कचाट्यात

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 26 मार्च 2018

कऱ्हाड - मटक्‍याच्या व्यवसायातील ३६ लोकांना लागू झालेल्या हद्दपारीनंतर पोलिसांनी आता शहरातील गॅगस्टर्सना ‘मोका’ लावण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. जुन्या टोळीसदृश मारामाऱ्यांची माहिती पोलिसांनी जमा केली आहे. त्यासह जुन्या गुंडांवर नव्याने दाखल झालेल्या गुन्ह्यांचे रजिस्टर वेगळ्या पद्धतीने तयार केले आहे. त्यामुळे गुंडांच्या जुन्या रजिस्टर शिवाय नव्याने दाखल होणाऱ्या गुन्ह्यांचा ताळमेळ घालून त्यांच्यावर ‘मोका’ची कारवाई करण्याचा आराखडा पोलिसांनी हाती घेतला आहे. उंब्रजला दरोड्यातील टोळीला ‘मोका’ लागल्यानंतर आता शहरातील गुंडही पोलिसाच्या ‘हिटलिस्ट’वर आले आहेत. 

उंब्रज येथे मागील काही महिन्यांपूर्वी दरोडा टाकण्यात आला. त्यात नगर जिल्ह्यातील टोळी जेरबंद झाली. त्या टोळीवर मोकांतर्गत कारवाई करण्यात आली. त्यानंतर पोलिसांनी सलग दोन टोळ्यांना हद्दपार केले. त्यात मटका बुकींसह मटक्‍याच्या व्यवसायात साथ देणाऱ्यांचाही समावेश होता. त्यांना नऊ तालुक्‍यांतून हद्दपार केले. त्यानंतर पोलिसांनी वेगळ्या पद्धतीने टोळीसदृश गुंडांवर पोलिसांनी नजर ठेवली आहे. त्याशिवाय गुंडांना अर्थपुरवठा करणाऱ्यांसह त्यांचे स्थानिक सल्लागार, त्यांच्या जिवावर दहशत माजवणाऱ्यांवरही पोलिसांचे लक्ष आहे. तडीपार गुंडांचे अनेक कारनामे यापूर्वी पोलिसांनी अशाच पद्धतीने उघड केले आहेत. त्यामुळे जुन्या गुंडांवर वचक ठेवण्यासाठी नव्या गुन्ह्यांचा आधार घेऊन पोलिस त्यांचे रेकॉर्ड ‘मोका’साठी वापरणार आहेत. त्यामुळे त्याची चर्चा शहरात जोरात आहे. पोलिसांनी त्या अनुषंगाने माहितीही जमा करण्याचे काम हाती घेतले आहे. 

शहरात छुप्या पद्धतीने व्यापाऱ्यांना वेठीस धरून खर्चासाठी खंडणी मागणाऱ्या गुंडांची दहशत आहे. त्या गुंडांना रेकॉर्डवर आणून त्यांच्यावर ‘मोका’ची कारवाई कशी करता येईल, याचा पोलिस अभ्यास करत आहेत. गुंडांच्या टोळीला हद्दपार करण्याचे किंवा त्यांना ‘मोका’ लावण्याचे अधिकार पोलिस अधीक्षकांकडे आहेत. त्यामुळे त्याचा वापर करून पोलिस शहरातील गुंडगिरीवर वचक ठेवण्याचा प्रयत्न करत आहेत. मध्यंतरी एका गुंडाची तुरूंगातून जामिनावर सुटका झाली. त्याच्या स्वागताला कोल्हापूर येथील कळंबा कारागृहात शहरातून २५ वर वाहने गेली होती. त्या सगळ्या वाहनांसह गुंडाच्या स्वागताला गेलेल्यांवर पोलिसांनी कारवाई करत त्यांना रेकॉर्डवर घेतले आहे. कोल्हापूरहून सुटलेली वाहने थेट कऱ्हाडात आल्यानंतर त्यांच्यावर कारवाई करण्यात आली. त्या भीतीने जामिनावर सुटलेला गुंड दुसऱ्या दिवशी भूमिगत झाला आहे, तो अद्यापही शहरात आलेला नाही. त्यामुळे गुंडांच्या टोळ्यांवर लक्ष ठेवून त्यांना ‘मोका’च्या कचाट्यात आणण्याचा प्लॅन पोलिसांनी आखला आहे.

...यावर पोलिसांचे आहे लक्ष 
 गुंडांच्या जुन्या टोळीच्या गुन्ह्याची माहिती घेण्याचे काम सुरू 
 जुन्या गुन्ह्यांसह नव्याचे रेकॉर्ड होणार अद्ययावत 
 टोळ्यांच्या प्रत्येक हालचालीवर लक्ष ठेवून घेणार नोंदी 
 गुंडाचे स्वागत करणाऱ्यांवर पोलिस ठेवणार ‘वॉच’ 
 व्यापाऱ्यांना धमकावून खंडणी घेणाऱ्यांवरही ठेवणार लक्ष

Web Title: karad news tadipar gund gang moka crime