‘सह्याद्री व्याघ्र’मध्ये शाश्वत निसर्ग पर्यटनगृहांची उभारणी 

सचिन शिंदे 
सोमवार, 2 जुलै 2018

कऱ्हाड - सह्याद्री व्याघ्र प्रकल्प व त्याला लाभलेल्या निसर्गाच्या सानिध्यात राहण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांना त्याचा आनंद घेता यावा, यासाठी नैसर्गिक पद्धतीने राहण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे. त्यासाठी व्याघ्र प्रकल्पात स्वयंम शाश्वत निसर्ग पर्यटनगृह उभारण्यात आली आहेत. त्यासाठी वन्यजीव विभागाने पुढाकार घेतला आहे. 

कऱ्हाड - सह्याद्री व्याघ्र प्रकल्प व त्याला लाभलेल्या निसर्गाच्या सानिध्यात राहण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांना त्याचा आनंद घेता यावा, यासाठी नैसर्गिक पद्धतीने राहण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे. त्यासाठी व्याघ्र प्रकल्पात स्वयंम शाश्वत निसर्ग पर्यटनगृह उभारण्यात आली आहेत. त्यासाठी वन्यजीव विभागाने पुढाकार घेतला आहे. 

सह्याद्री व्याघ्रच्या बामणोली परिक्षेत्रात निसर्ग पर्यटनगृह उभारण्यात आली आहेत. बामणोली परिक्षेत्रात वासोटा किल्ल्यावर मोठ्या प्रमाणात पुणे, मुंबईसह राज्यातील अनेक ठिकाणचे पर्यटक येऊन राहतात. बामणोली किंवा तापोळ्याला त्यांचा मुक्काम असतो. निसर्गाच्या सानिध्याचा आनंद लुटण्यासाठी येणाऱ्यांना नैसर्गिक पद्धतीने मुक्काम करता यावा, यासाठी वन्यजीव विभागाने निसर्ग पर्यटनगृह सुरू करण्याचा निर्णय घेतला. 

त्यानुसार बामणोली परिसरात ते गृह उभे आहेत. व्याघ्र प्रकल्पात अशा प्रकाराचे स्वयंम शाश्वत निसर्ग पर्यटनगृह उभे करण्याचा हा पहिलाच प्रयोग आहे. आंबवडे गावात पर्यटकांसाठी सर्व सोयी-सुविधांनीयुक्त असे पर्यटनगृह उभारण्यात आले आहे. डॉ. श्‍यामाप्रसाद मुखर्जी जनविकास योजनेंतर्गत त्याची उभारणी झाली आहे. त्याच योजनेंतर्गत त्याचे काम चालते. त्यात मुलांना ट्रेनिंग देण्यात येते. त्यासाठी इच्छुक ५० मुलांनाही त्याचे प्रशिक्षणही देण्यात आले आहे. त्यामुळे बफऱ झोनमधील बेरोजगार युवकांसाठी रोजगार उपलब्ध होण्यास हातभार लागला आहे. त्याचबरोबर सह्याद्री व्याघ्रच्या निसर्ग सानिध्यात मुक्कामी येणाऱ्या पर्यटकांना नैसर्गिक पद्धतीने राहण्याची सुविधा उपलब्ध झाली आहे. 

सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात अत्याधुनिक सुविधा देण्यासाठी व पर्यटकांना तेथे राहण्याचा नैसर्गिक आनंद मिळावा, यासाठी नैसर्गिक पर्यटनगृह उभारण्यात आली आहेत. त्याचा पर्यटकांना आनंद घेता येणार आहे.

-विनिती व्यास, उपसंचालक,  सह्याद्री व्याघ्र प्रकल्प, कऱ्हाड

निसर्ग पर्यटन केंद्रात... 
 इको हन्टस, लॉग हाउस, ओपन डायनिंग हॉलची सुविधा 
 चुलीवरील गावठी व पारंपरिक जेवण
 गांडूळ खताच्या आधारावरील सेंद्रिय शेतीतील भाज्या, फुले उपलब्ध 
 स्थानिक शेतकऱ्यांच्या भाज्यांचीही उपलब्धतता करून दिली जाणार 
 पर्यटन केंद्रात पपई, शेवगा, कोकम, लिंबू, केळी यासारखी सेंद्रिय फळे विक्रीस उपलब्ध
 गावकऱ्यांच्या पाळीव गावठी कोंबड्यांची अंडीही पुरवण्याची योजना
 सफारीसाठी स्थानिक मुलांना गाइड म्हणूनही सेवा उपलब्ध राहील

Web Title: karad news tourism halls Sahyadri-Tiger-Reserve