कराड तालुक्यात एक मुलगा पाण्यात बुडाला

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 9 मे 2017

कराड : सैदापुर (ता. कराड) येथे आज (मंगळवार) दुपारी एकच्या सुमारास तिघेजण पाण्यात बुडू लागली होती. तिघांपैकी दोघेजण पाण्याबाहेर आले तर एक जण बुडाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, येथे नातेवाईकांकडे सुट्टीनिमित्त आलेली 3 मुले पोहण्यासाठी खोडशी धारणा जवळ गेले होते. तिघांपैकी कोणालाही पोहता येत नव्हते. पाण्यात बुडू लागल्यानंतर दोघे बाहेर आले तर एक मुलगा बुडाला आहे. त्याचा शोध सुरू आहे. एक सैदापुर, एक कडेगाव व एक सातारा येथील रहिवासी आहे. तिघेही नातेवाईंकाकडे सैदापुरला आले होते. पाण्यात बुडालेला मुलगा सातारा येथील असून, मुलाचे नाव प्रथमेश विजय वाडकर (वय 14) असे आहे.

Web Title: karad: one boy missing in water

टॅग्स