कऱ्हाड पोलिसांची तुफान कामगिरी; संशयित खूनी ताब्यात

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 14 फेब्रुवारी 2020

कऱ्हाड पोलिसांनी संबंधित गुन्ह्यातील संशयिताला पकडण्यासाठी पथके रवाना केली होती. शहर पोलिसांच्या पथकाने ओगलेवाडीतुन एका संशयिताला ताब्यात घेतले आहे.

कऱ्हाड : महिलेचा निर्घुण खून करून तिचा मृतदेह ओढ्या नजीकच्या झाडाला तारेने बांधून ठेवल्याची घटना गुरुवारी ता. 13 सायंकाळी उघडकीस आली.  सुमन शंकर शेलार (वय 45, रा. माळवाडी) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. अत्यंत निर्दयीपणे सुमन यांचा खून झाल्याने परिसरात खळबळ उडाली होते.

माळवाडीच्या देशपांडा नावाच्या शिवारात शेतात कामास गेलेल्या काही महिलांना सबंधित महिलेचा खून झाल्याचा प्रकार दिसला. त्यांना मृतदेह दिसल्यांनतर त्यांनी त्याची माहिती त्वरीत काही लोकांना दिली. त्यातील काहींनी ती माहिती उंब्रज पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरिक्षक अजय गोरड यांना दिली. सहायक पोलिस निरिक्षक गोरड व त्यांच्या सहकारी त्वरीत तेथे पोचले. सुमन सेलार या माळवाडीच्याच असल्याने त्वरीत त्यांची ओळख पटली. ज्यांना मृतदेह दिसला. त्यांनीच तो ओळखला होता. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून महिलेचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवला. खून का झाला, त्याचे कारण अद्यापही अस्पष्ट आहे. संबंधीत महिलेच्या डोक्यावर डोक्यावर, कानावर दगडाने ठेचून मारण्यात आले आहे, असे पोलिसांनी सांगितले. निर्दयीपणे दगडाने ठेचल्यानंतर त्या महिलेचा मृतदेह माळवाडी नजीक देशपांडा नावाच्या शिवारातील ओढ्यातून ओढत आणण्यात आला आहे. ओढ्या पलीकडच्या करंजाच्या झाडाला त्या महिलेचा मृतदेह तारेने बांधण्यात आला होता. दुपारी तीनच्या सुमारास घटना घडली असावी, असा पोलिसांचा अंदाज आहे.

सायंकाळी रानातून घरी जाणाऱ्या लोकांना ती गोष्ट लक्षात येताच त्यांनी त्याची माहिती पोलिसांना दिली. पोलिसही सायंकाळी घटनास्थळी पोचले. त्यांनी परिसरात पहाणी केली. त्यावेळी महिलेली मारलेली जागा, तिचा मृतदेह ओढत आणल्याच्या खूणा पोलिसांना दिसल्या. महिल्याच्या गळ्यातील दागिनेही संबधितांनी लंपास केले होते. त्याशिवाय त्या महिलेच्या मोबाईलही फोडून त्यातील बॅटरी व सीम कार्ड मृतदेहाजवळ टाकण्यात आले होते. पोलिसांनी घटनास्थळावर पहाणी केली आहे. मात्र त्याही पेक्षा जास्त काही सापडले नाही. अंधार असल्याने तेथून मृतदेह हलविण्यात आला आहे. महिलेच्या निर्घूण खूनामुळे परिसरात खळबळ उडाली होती.

पोलिस उपाधिक्षक सुरज गुरुव यांच्या मार्गदर्शनाखाली तातडीने तपासासाठी पथके रवाना झाली होती. कऱ्हाड शहर पोलिस ठाण्याच्या वरिष्ठ पोलिस निरीक्षक बी. आर. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक विजय गोडसे यांच्या पथकाने संबंधित संशयितास ओगलेवाडीतुन ताब्यात घेतले आले. संशयितास उंब्रज पोलिसांच्या ताब्यात देण्यात आल्याचे कऱ्हाड पोलिसांनी सांगितले.

वाचा : व्हॅलेंटाईन डे पुर्वीच त्याला जेलची हवा; गर्भ वाचला

हेही वाचा : साताऱ्याचे 'हे' नेते चालले पुन्हा राष्ट्रवादीत


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Karad Police Arrested Suspect Who Killed Woman