व्हॅलेंटाईन डे पुर्वीच त्याला जेलची हवा; गर्भ वाचला

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 13 फेब्रुवारी 2020

संबंधित जोडप्याला वडूज पोलिसांनी ताब्यात घेतले. गर्भवती महिलेची प्रकृती बिघडल्याने तिला क्रांतीसिंह नाना पाटील जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. 

कातरखटाव (जि. सातारा) : नवरा बायकोचे नाते असल्याचे भासवून बनावट कागदपत्रे तयार करून गर्भपात करण्यासाठी आलेल्या जोडप्याला वडूज येथे अटक करण्यात आली आहे. हा प्रकार डाॅ. वेदिका आणि विवेकानंद माने यांच्या सतर्कतेमुळे उघडकीस आला आहे.

याबाबत पाेलिसांनी दिलेली अशी, वडूज येथील एका खासगी दवाखान्यात मंगळवारी ता. 11 भांडवलकर नावाचे जोडपे तपासणीसाठी आले होते. संजय भांडवलकर (रा. पाचवड ता. माण) असे त्याने स्वतःचे नाव सांगितले. आपली पत्नी गर्भवती आहे. सध्या तिचे शिक्षण सुरु आहे. त्यामुळे आम्हांला सध्या अपत्य नकोय. तरी आम्हांला गर्भपात करावयाचा आहे असे नमूद केले. ही सर्व माहिती संजय भांडवलकर यांनी डॉ. वेदिका विवेकानंद माने यांच्यापूढे सांगितली. डॉ. माने यांनी संबंधित महिलेची सोनोग्राफी केली. त्यामध्ये संबंधित महिलेस तीन महिन्यांच्या जिवंत गर्भ असल्याचे दिसून आले. डॉ. माने यांनी जाेडप्यास दुसऱ्या दिवशी येण्यास सांगितले. त्यानूसार हे जाेडपे बुधवारी (ता. 12) दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास पुन्हा डाॅ. माने यांच्या दवाखान्यात गेले. त्यावेळी डाॅ. माने यांनी संबंधित जाेडप्यास आधारकार्डची मागणी केली. संबंधित जाेडप्याने आधारकार्ड दाखविल्यानंतर त्यामध्ये तफावत आढळली.
 
डॉ. साै. माने आणि डॉ. विवेकानंद माने यांच्यात चर्चा झाली. चर्चेअंती आणि भांडवलकर यांच्या नात्यातील व्यक्तींचा डाॅ. श्री. माने यांचा परिचय हाेता. तसेच संजय भांडवलकर याच्या पत्नीला डाॅ. माने पहिल्यापासून ओळखत हाेते. त्यामुळे सदर जाेपडे हे पती - पत्नी नसल्याची खात्री माने दांपत्याची झाली. त्यामुळे डॉ. वेदिका माने यांनी वडूज पोलीस ठाण्यात दूरध्वनी करुन कर्मचारी बोलावून घेतले. तसेच त्या जोडप्यावर फिर्याद दाखल केली. सदर जोडप्याला वडूज पोलिसांनी ताब्यात घेतले. संबंधित महिलेची प्रकृती बिघडल्याने तिला जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. या प्रकरणी पाेलिसांनी संजय भांडवलकर यास अटक करण्यात आली. या गुन्ह्याचा तपास पोलिस हवालदार विकास जाधव करीत आहेत. 

वाचा : ...थालीपीट,पुरणपोळीपासून बिर्याणीपर्यंत सारे काही

हेही वाचा : सातारकर संतप्त मुलींनी युवकाला चोपले

वाचा : जय शिवराय ! अखेर शिवप्रेमींनी करुन दाखवलंच 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Vaduj Police Arrested Suspect Couple Who Tried For Abortion