एसटी इमारतीला दाखल्याची प्रतीक्षा

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 1 नोव्हेंबर 2017

कऱ्हाड - एसटीच्या येथील नवीन बस स्थानक इमारतीचे काम मुदतवाढ देऊनही अद्याप सुरूच आहे. संबंधित ठेकेदारांना झालेले काम एसटीकडे हस्तांतरित करण्यासाठी पालिकेकडून सद्य:स्थितीत इमारतीच्या पूर्ण झालेल्या कामाचा दाखला पाहिजे. त्यासाठी १५ दिवसांपूर्वी कागदोपत्री कार्यवाही करूनही पालिकेकडून अद्याप दाखला देण्यात आलेला नाही. पालिकेचा दाखला मिळाल्याशिवाय काम हस्तांतरित होणार नसल्याने प्रवाशांना आणखी काही दिवस अडचणींचा सामना करावा लागणार आहे.

ज्येष्ठ नेते यशवंतराव चव्हाण यांच्या जन्मशताब्दी वर्षातील कामांतून आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी मुख्यमंत्री असताना दिलेल्या ११ कोटी रुपयांच्या निधीतून येथील नवीन बस स्थाकनाचे काम सुरू आहे. हे काम मुळातच उशिरा सुरू झाले. त्यानंतरही ज्या गतीने काम होणे अपेक्षित होते, त्या गतीने झाले नाही. त्यामुळे पूर्ण पावसाळाभर प्रवाशांना चिखल, पाण्यातूनच बस स्थानकात ये-जा करावी लागली. त्यामुळे त्यांची मोठी गैरसोय झाली. बांधकामासाठीच्या या वेळकाढू कामामुळे प्रवाशांची मोठे हाल सुरू आहेत. त्याकडे कोणी लक्ष देणार आहे की नाही? अशी स्थिती सध्या निर्माण झाली आहे. सध्या बस स्थानकाचे काम अंतिम टप्प्यात आहे.

त्यामुळे ठेकेदाराकडून संबंधित इमारत एसटीकडे हस्तांतरित करण्याची कार्यवाही सुरू आहे. त्यासाठी पालिकेकडे संबंधित कागदपत्रे सादर करण्यात आली आहे. त्याला १५ दिवसांचा कालावधी झाला तरी अद्यापही पालिकेकडून संबंधित कामाच्या पूर्णत्वाचा दाखला आला नसल्याचे आगार व्यवस्थापक जे. डी. पाटील यांनी सांगितले. अगोदरच बस स्थानकाचे काम धिम्या गतीने सुरू असताना पालिकेकडूनही दाखल्यासाठी वेळ लागत असल्याने एसटीकडे संबंधित इमारत हस्तांतरित करण्याची कार्यवाही रखडली आहे. त्यामुळे पुढील कामही रखडले आहे.

बस स्थानक इमारतीच्या कामाच्या हस्तांतरणासाठी पालिकेकडून दाखला हवा आहे. त्यासाठीची १५ दिवसांपूर्वी कार्यवाही केली आहे.  बस स्थानक आवारातील रस्ता करण्यासाठी बसची ये-जा करण्याची गेट बदलावी लागतील. त्यासाठीही कार्यवाही सुरू आहे. 
- जे. डी. पाटील, आगार व्यवस्थापक, कऱ्हाड   

Web Title: karad satara news karad bus stand building