चाकरमान्यांची घरे चोरट्यांकडून ‘टार्गेट’

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 25 ऑक्टोबर 2017

कऱ्हाड - शहरातील चोऱ्यांच्या तपासात मुळात अपयशी ठेरलेल्या पोलिसांपुढे सुट्यांच्या काळात होणाऱ्या चोऱ्या नियंत्रणात आणून त्यांच्या तपासाचे आव्हान आहे. सणासुदीच्या काळात गावी गेलेल्या चाकरमान्यांची बंद घरे चोरट्यांनी लक्ष्य केली आहेत. त्या बंद घरात होणाऱ्या चोऱ्या रोखण्यासाठी पोलिसांनी उपाययोजना करण्याची गरज आहे. शहरातील उपनगरांत चोऱ्या वाढल्या आहेत. तेथे बाहेरहून येथे नोकरी निमित्ताने आलेले अनेक लोक स्थायिक आहेत. सुटीच्या काळात ते लोक घर बंद करून गावी जातात. त्यावेळी ती बंद घरे हेरून चोरट्यांकडून ती फोडली जातात. तीच स्थिती लक्षात घेवून पोलिसांनी उपाययोजना करण्याची गरज आहे. 

शहरातील वाढीव हद्दीतील कॉलन्यांसह विद्यानगर भागातील कॉम्पलेक्‍स, मलकापूरपासून नांदलापूरच्या काही भागात, कोयना वसाहत, कापील-गोळेश्वर रस्ता, वारूंजी फाट्यापासून गोटे, मुंढेपर्यंतच्या भागात अनेक चाकरमानी राहतात. बहुतांशी शिक्षकांची संख्या सर्वाधिक आहेत. अनेकजण भाड्याने खोली घेवून राहतात. अनेकांची स्वतःची घरेही आहेत. संबंधितांची गावे शेजारील जिल्ह्यात, तालुक्‍यात आहेत. त्यामुळे बहुतांशी लोक सुटीला गावी जातात.

...अशी आहे स्थिती 
मलकापूरसह नांदलापूर, कोयना वसाहत, कापील, गोळेश्वर चोरट्यांकडून टार्गेट 
वारूंजी फाट्यापासून गोटे, मुंढेपर्यंतच्या रात्रीच्या घरफोड्या रोखण्याची गरज 
शहरालगतच्या वाढीव हद्दीतील कॉलन्यांमध्येही होताहेत चोऱ्या
विद्यानगर भागातील कॉम्प्लेक्‍समध्ये भरदिवसाही चोऱ्यांचे प्रमाण जास्त

...असे असावेत उपाय 
उपनगरांतून दिवसा व रात्रीचीही गस्त वाढवावी
चोरट्यांकडून लक्ष्य होणाऱ्या बंद घरांच्या परिसराचा अभ्यास व्हावा 
गस्त घालताना तेथे पोचण्याच्या सर्वच मार्गांचा पोलिसांनी अभ्यास करावा 
कॉलन्यांतील स्थानिक लोकांची मदत घेऊन उपाय करावेत.

Web Title: karad satara news thief