esakal | माजी मुख्यमंत्र्यांच्या दारात महिलांनी मागितली भीक
sakal

बोलून बातमी शोधा

माजी मुख्यमंत्र्यांच्या दारात महिलांनी मागितली भीक

हॉकर्स झोनबाबत काहीही निर्णय घेत नसल्याचा निषेध फळविक्रेत्या महिलांनी आज भिक मागून आंदोलन केले असे हातगाडा धारक संघटनचे अध्यक्ष जावेद नायकवडी यांनी सांगितले.

माजी मुख्यमंत्र्यांच्या दारात महिलांनी मागितली भीक

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

कऱ्हाड : हॉकर्स झोनसाठी हातागाडाधारक आक्रमक झाले आहेत. महिला दिना दिवशीच रविवारी ता. आठ मार्च महिला विक्रेत्यांनी शहरात हॉकर्स झोन होत नसल्याच्या निषेधार्थ भिक मांगो आंदोलन केले. आंदाेलक महिलांनी माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण यांच्या घरी जावून भिक मागीतली. त्याशिवाय हॉकर्स झोन व्हावा, यासाठी लक्ष घालण्याची विनंती केली. श्री. चव्हाण यांचे पुतणे व युवा नेते इंद्रजीत चव्हाण, स्वीय सहायक गजानन आवळकर यांच्याशी त्यांनी चर्चा केली. हातगाडीधारकांनी त्यांना निवेदनही दिले.

अतिक्रमण हटाव मोहिमे सुरू असल्यापासून दहा दिवस व्यवसाय बंद आहे. त्यांच्या चरितार्थाचा प्रश्न निर्माण झाला असतानाही पालिका हॉकर्स झोनबाबत काहीही निर्णय घेत नसल्याचा निषेध फळविक्रेत्या महिलांनी आज भिक मागून आंदोलन केले आङे, असे हातगाडा धारक संघटनचे अध्यक्ष जावेद नायकवडी यांनी सांगितले. सहकार मंत्री तथा पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी हातागाडधारक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सांयकाळी चर्चेसाठी बोलालवले आहे, असेही श्री. नायकवडी यांनी स्पष्ट केले. 

तत्पूर्वी काल हॉकर्स झोन व्हावा, या मागणीसाठी हातगाडा धारकारकांनी अऩेकांच्या गाटीभेटी घेतल्या. हातगाडीधारक अनेक दिवासांपासून पालिकेत खेटे घालत आहेत. दिवसभरात दोन वेळा त्यांची बैठक झाली. त्या बैठकीत हॉकर्स झोनसाठी दोन वेगवेगळ्या जागा सुचविल्या आहेत. त्या जागेबाबात दिवसभरात कळवण्यात येईल, असे पालिकेतून सांगण्यात आले होते. त्याबाबत काहीच निर्णय आजअखेर आला नाही. त्यामुळे पुन्हा हातगाडे धारक त्या मागणीसाठी आक्रमक झाले. हातगाडा धारकांनी पालिका पदाधिकाऱ्यांनी भेट घेतली. व्यवसाय बंद आहे, त्यामुळे रोजी रोटीचा प्रश्न निर्माण झाल्याची व्यथा त्यांनी मांडली. हातगाडे लावत नाही, मात्र झोन करा अशी मागणी केली. त्या जागेचा प्रश्न सुटत नाही. तोपर्यंत हातगाडेधारक आहे त्या ठिकाणी हातगाडे लावतील, त्यासाठी परवानगी मागीतली. हातगाडाधारक आक्रमक झाले. सर्वच हातगाडाधारक दुपारी येथील यशवंतराव चव्हाण स्मृती सदनात जमले. तेथे पालिकेचा कार्यक्रम सुरू होता. त्यावेळी कार्यक्रम संपल्यानंतर त्यांनी नगरसेवकांशी चर्चा केली.

नगराध्यक्ष रोहिणी शिंदे, विरोधी पक्षनेते सौरभ पाटील, नियोजन सभापती विजय वाटेगावकर, महिला व बालकल्याण सभापती स्मिता हुलवान, माजी नगराध्यक्षा शारदा जाधव, नगरसेविका अंजली कुंभार, श्रीमती आशा मुळे यांच्यासबोत त्यांची चर्चा झाली. तेथेही सकारात्मक चर्चा झाली. हातगाडेधारक तेथील चर्चेनंतर पालिकेत गेले. तेथे गट नेते राजेंद्र यादव, ज्येष्ठ नगरसेवक विनायक पावसकर यांच्याशी चर्चा केली. चर्चा सकारात्मक झाली. त्यावेळी सोमवारी विशेष सभा आहे, त्या सभेत हॉकर्स झोनचा विषय मांडण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. त्याचवेळी झोनसाठी योग्य निर्णय घेण्याची कबुली संबधितांनी दिली. गटनेते यादव यांनी उद्या समक्ष जागेची पाहणी करु असे आश्वासन दिले. यावेळी संघटनेचे अध्यक्ष जावेद नायकवडी, सतिश तावरे, हरिश बल्लाळ, गजानन कुंभार, आशपाक मुल्ला, रमेश सावंतसह अन्य हातगाडा धारक उपस्थित होते. त्यानंतरही हॉकर्स झोन व्हावा, यासाठी हातगाडाधारक वेगळ्या भूमिकेत होते. त्यांनी आज (रविवारी) जागतिक महिला दिनानिमित्त शहरात भिक मांगो आंदलन केले. फळविक्रेत्या महिला भिक मांगो आंदोलन करताना माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण यांच्या घरी भिक मागितली, असे त्यांनी स्पष्ट केले. हातगाडे बंद असल्याने होणारी उपासमारीच्या निषेधार्थ भिक मांगो आंदोलन करण्याची वेळ आली आहे, असे अध्यक्ष नायकवडी यांनी सांगितले.