तालुका क्रीडा संकुल नांदलापुरात धूळखात!

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 7 जुलै 2017

कऱ्हाड - ग्रामीण भागातूनही राष्ट्रीय दर्जाचे खेळाडू तयार व्हावेत, यासाठी शासनाच्या क्रीडा विभागाने प्रत्येक तालुक्‍याच्या ठिकाणी क्रीडा संकुल बांधण्याचा निर्णय घेतला. त्यातून एक कोटी रुपये खर्चून तालुका क्रीडा संकुल बांधण्यात आले. मात्र, त्याला बांधल्यापासूनच टाळा लावला आहे. आडबाजूला असल्याने तेथे खेळाडूच फिरकत नाहीत. वापरात नसल्याने इमारतीचीही दुरवस्था झाली असून, परिसरातही झाडेझुडपे वाढून बकाल स्थिती झाली आहे. 

कऱ्हाड हे तालुक्‍याचे ठिकाण असले, तरी तेथे जिल्ह्याच्या दर्जाच्या अनेक सुविधा आहेत. त्यातून लोकांची चांगली सोय होत आहे. कऱ्हाड तालुक्‍यातील ग्रामीण भागातून खेळाडूंना शास्त्रशुद्ध प्रशिक्षणासाठी नांदलापूर येथे तालुका क्रीडा संकुल बांधण्यात आले. मात्र, बांधल्यापासूनच ते बंद स्थितीत आहे. त्यामुळे क्रीडा संकुल बांधकामाचा हेतूच बाजूला पडल्यासारखी स्थिती आहे. तेथे जाण्यासारखी सोयही राहिली नाही. इमारतीच्या खिडक्‍यांना काचांचा पत्ता नाही. इमारतीभोवती मोठ्या प्रमाणात झाडेझुडपे वाढली आहेत. इमारतीच्या पाठीमागील बाजूस असणाऱ्या शौचालयाच्या टाकीचे झाकण गायब आहे. इमारतीभोवती बांधण्यात आलेल्या संरक्षक भिंतीचीही पडझड सुरू आहे. त्यामुळे सध्या दुरवस्थेत तालुका क्रीडा संकुल आडकले आहे. त्यामुळे धड खेळाडू तिकडे जात नाही आणि तेही उघडले जात नाही. 

इमारतीच्या संरक्षणाची बोंब 
शासनाच्या कोट्यवधी रुपयांच्या निधीतून बांधलेले क्रीडा संकुल बांधल्यापासून असेच पडून आहे. त्याला कोणीच वाली नाही, अशी स्थिती आहे. इमारत व परिसराच्या संरक्षणाचाही बोंब आहे. 

तालुक्‍यातील लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष
कऱ्हाड तालुक्‍याला शासनाच्या कोट्यवधी रुपयांच्या निधीतून तालुका क्रीडा संकुल बांधले आहे. ते बांधल्यापासून त्याकडे प्रशासन, लोकप्रतिनिधींचेही दुर्लक्ष झाल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे त्यावर कोणाचाच अंकुश राहिला नसल्याची स्थिती आहे. लोकप्रतिनिधींनी तरी त्याकडे लक्ष द्यावे, अशी मागणी खेळाडूंतून होत आहे. 

Web Title: karada satara news sports complex