भाजपकडून जनसुराज्य शक्ती पक्षाला दोन महामंडळे

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 6 सप्टेंबर 2019

कोल्हापूर - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व भाजप प्रदेशाध्यक्ष व महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी भाजपचा सहावा घटक पक्ष म्हणून सत्तेत सहभागी झालेल्या जनसुराज्य शक्ती पक्षाला दोन महत्त्वाची पदे देऊन एका अर्थाने सन्मान केला आहे. जनसुराज्य युवा शक्तीचे प्रदेशाध्यक्ष समित कदम यांना वस्त्रोद्योग महामंडळ उपाध्यक्षपद व शाहूवाडीचे युवा नेते कर्णसिंह गायकवाड यांना यंत्रमाग महामंडळाचे उपाध्यक्ष पद 
देण्यात आले.

कर्णसिंह गायकवाड यांच्या रूपाने नव्याने जनसुराज्यमध्ये दाखल झालेल्या व समित कदम यांच्या रूपाने एकनिष्ठ कार्यकर्त्याला पदे देऊन समतोल साधण्यात जनसुराज्य शक्तीचे संस्थापक अध्यक्ष माजी मंत्री विनय कोरे यांना यश आले आहे. पिशवी येथे झालेल्या सभेमध्ये विनय कोरे व कर्णसिंह गायकवाड यांनी या संदर्भात सूचक वक्तव्य केले होते. या पदामुळे संजयसिंह गायकवाड यांच्यावर प्रेम करणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांना न्याय मिळाल्याची चर्चा शाहूवाडी तालुक्‍यात होत आहे.

समित कदम वस्त्रोद्योग महामंडळाचे उपाध्यक्ष
जनसुराज्य युवा शक्तीचे प्रदेशाध्यक्ष समित कदम यांना वस्त्रोद्योग महामंडळाचे उपाध्यक्षपद देण्यात आले. नव्याने जनसुराज्यमध्ये दाखल झालेल्या व समित कदम यांच्या रूपाने एकनिष्ठ कार्यकर्त्याला पदे देऊन समतोल साधन्यात संस्थापक अध्यक्ष माजी मंत्री विनय कोरे यांना यश आले.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Karansinh Gaikwad, Sumit Kadam on Corporation