कऱ्हाड - शहरातील हॉकर्स झोनचा प्रश्न लागणार मार्गी

सचिन शिंदे
शुक्रवार, 24 ऑगस्ट 2018

कऱ्हाड - शहरातील प्रलंबीत राहिलेल्या हॉकर्स झोनचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी पालिकेने पुढाकार घेतला आहे. त्याचाच भाग म्हणून आजपासून हॉकर्सची संख्या, त्याचे सध्याचे ठिकाण व त्याच्या व्यवसायाचे स्वरूप अशा पद्धतीचा बायोमेट्रीक सर्व्हे पालिकेने सुरू केल आहे. त्या माध्यामातून शहरातील सध्याची स्थितीचा अभ्यास करून भविष्यात हॉकर्स झोन ठरवण्याचे धोरण निश्चीत केले जाणार आहे. 

कऱ्हाड - शहरातील प्रलंबीत राहिलेल्या हॉकर्स झोनचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी पालिकेने पुढाकार घेतला आहे. त्याचाच भाग म्हणून आजपासून हॉकर्सची संख्या, त्याचे सध्याचे ठिकाण व त्याच्या व्यवसायाचे स्वरूप अशा पद्धतीचा बायोमेट्रीक सर्व्हे पालिकेने सुरू केल आहे. त्या माध्यामातून शहरातील सध्याची स्थितीचा अभ्यास करून भविष्यात हॉकर्स झोन ठरवण्याचे धोरण निश्चीत केले जाणार आहे. 

शहरातील हाकर्स झोनबाबत पालिकेतून वेगवेगळे सुर उमटत आहेत. मध्यंतरीच्या काळ्यात हॉकर्स झोन म्हणून ज्या काही जागा पालिकेने ठरवू दिल्या आहेत. त्या जागांना शहरातील स्थानिक रहवाशांसह व्यापाऱ्यांनी जोरदार विरोध केला. त्यामुळे पालिकेने तीय योजना गुंडाळली. त्यापूर्वी पालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकाने स्टेशन रस्ता, बस स्थानकासह त्या भागातील अनेक अतिक्रमणे हटवली. तीन दिवस ती मोहिम सुरू होती. त्यातून हॉकर्स झोन ठरवण्यास गती मिळाली. हातागाडी धारक संघटनेने त्याला विरोध करत हॉकर्स झोन ठरवण्याच्या आग्रह धरला. दोन दिवास वाट पाहून संघटनेने आक्रमक भुमिका घेत ज्या टिकाणी हातगाडे होते. त्याच ठिकाणी आम्ही लावणार, अशी आक्रमक भुमिका घेत. त्यांनी ते हातगाडे त्या टिकाणी लावलेही आजही ते तसेच आहेत. पालिकेने हातगाडी धारकांवर आजअखेर कोणतीही कारवाई केली नाही. मात्र पालिकेने हॉकर्स झोन व त्यांची संख्या किती आहे, त्याचा बायोमेट्रीक पद्धतीने सर्व्हे होणार आहे. पालिकेचे मुख्याधिकारी यशवंत डांगे यांनी त्यासाठी पुढाकार घेतला आहे. वास्तविक बायोमेट्रीक पद्धतीने हॉकर्स झोन ठरवा, असे शासानाने यापूर्वीच सुचवले आहे. त्याबाबत जिल्ह्यातील पालिका उदासिन आहेत. जिल्ह्यात सातारा पालिकेनंतर हॉकर्स झोनचा येथे बायोमेट्रीक सर्व्हे होत आहे. त्यामुळे शहरातील हॉकर्स, त्यांचा सध्याचा व्यवसाय, त्यांचे ठिकाण, त्यांचे आधारकार्ड, रहवाशी दाखला, हातागाडी संघटनेचे सदस्यत्वाचा दाखला, शिधा पत्रिका यासह विविध माहिती घेण्यात येणार आहे. ती माहिती जमा झाल्यानंतर त्याबाबत भविष्यातील हॉकर्स झोन ठरवण्याचा दोरणात्मक निर्णय घेण्यात येणार आहे. शहरात किती हॉकर्स आहेत. त्यांचा व्यवसाय काय आहे. त्या सगळ्याची माहिती हाती आल्यानंतर दिसून पालिका त्याबाबत ठोस धोरण ठरवण्याच्या तयारीत आहे. 

असा होणार सर्व्हे
* शहरातील हॉकर्सबाबात सगळी माहिती द्यावी लागणार 
* शहरातील हॉकर्स संख्या कळाल्यानंतर वाढीव बागात होणार सर्व्हे 
* हातागाडी धरकांना द्यावे लागणार पुरावे 
* पालिकेचा पूर्वीचा परवान असणाऱ्यांना देणार प्राधान्य
* हातागाडीधारक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना विश्व्सात घेवून होणार सर्व्हे

Web Title: Karhad - The question of Hawker's zone in the city will be solved soon