कऱ्हाड - गुटखा विक्री करणाऱ्या एका युवकाला अटक

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 24 ऑगस्ट 2018

कऱ्हाड - गुटखा विक्रीवर बंदी असतानाही गुटख्याची वाहतुक करुन त्याचे वितरण करणाऱ्या एका युवकाला शहर पोलिस ठाण्याच्या वाहतुक शाखेच्या कर्मचाऱ्यांनी गुटख्यासह ताब्यात घेतले. सुरज शिवाजी नलवडे (रा. गोळेश्वर, ता.कऱ्हाड) असे संबंधित ताब्यात घेण्यात आलेल्याचे नाव असुन, त्याच्याकडुन गुटखा हस्तगत करण्यात आल्याची माहिती वाहतुक शाखेचे प्रमुख सहाय्यक पोलिस निरीक्षक एस. ए. गायकवाड यांनी आज दिली. 

पोलिसांची दिलेल्या माहितीनुसार, एक युवक दुचाकीवरून गुटख्याची विक्री करत असल्याची माहिती सहाय्यक पोलिस निरीक्षक गायकवाड यांना मिळाली होती. त्यांनी त्या युवकाच्या दुचाकीचा क्रमांक सर्व वाहतूक शाखेच्या पोलिस कर्मचाऱ्यांना देवुन संबंधित युवकास ताब्यात घेण्याच्या सुचना दिल्या. त्यानुसार हवालदार एस. एम. सावंत, श्री. चव्हाण हे कोल्हापूर नाक्यावर वाहनांची तपासणी करत असताना त्यांना संशयास्पदरित्या एक युवक दुचाकीवरून जाताना दिसला. पोलिसांनी त्याला अडवून त्याच्याकडे चौकशी केल्यावर त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यानंतर हवालदार सावंत संबंधित युवकाची बॅग तपासल्यावर त्यामध्ये गुटख्याचे पुडे त्यांना सापडले. त्यांनी त्याला ताब्यात घेऊन पोलिस ठाण्यात आणले. त्यावेळी तो कऱ्हाड-मलकापुर परिसरात अवैधरित्या गुटख्याचे वितरण करत असल्याचे चौकशीत पुढे आले. 

त्याची माहिती अन्न व औषध प्रशासन विभागाला कळवण्यात आली असुन त्याला गुटख्यासह त्यांच्या ताब्यात देण्यात येणार असल्याचे श्री. गायकवाड यांनी सांगितले.

Web Title: Karhad - A young man who was selling a gutka was arrested