कऱ्हाड - केंद्र व राज्यातील सरकार विरोधात युवक काँग्रेसचे निषेधासन

congress
congress

कऱ्हाड - राज्यातील सत्ताधारी पक्षाला चार वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर युवक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी आज बुधवारी कऱ्हाड (जि.सातारा) येथील कोल्हापुर नाक्यावर निषेधासन हे आंदोलन करुन सरकारचा निषेध नोंदवला. 

कोल्हापुर नाक्यावरील महात्मा गांधींच्या पुतळ्यासमोर युवक काँग्रेसने आज सकाळी केलेल्या आंदोलनास युवक काँग्रेसचे गणेश जगताप, विराज शिंदे, शैलेश चव्हाण, अमित जाधव, समीर पटवेकर, जगदीश पाटील, दादासाहेब काळे, अजित भोसले, जितेंद्र यादव, राहुल पवार, प्रसाद यादव, गोल्डन पवार, अजित केंजळे, विवेक चव्हाण, विक्रांत चव्हाण, संग्राम काळभोर, तारिक बागवान, किरण पाढरपट्टे यांच्यासह जिल्हा युवक कॉंगे्रसचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. 

यावेळी उपस्थितांना गेल्या चार वर्षात केंद्रातील व राज्यातील सरकारने केवळ घोषणाबाजी करुन शेतकरी, सर्वसामान्यांची फसवणुकच केली आहे. त्यामुळे राज्यातील सरकार हे फडणवीसांचे नसुन ते फसणवीसांचे आहे. त्यामुळे सरकारला सत्तेवर राहण्याचा अधिकार नसुन येणाऱ्या लोकसभा व विधानसभा निवडणुकीत भाजपाचा पराभव अटळ आहे, असा दावा युवक कॉंग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी केला. यावेळी जोरदार घोषणाबाजीही करण्यात आली. 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com