
सांगली - सांगली शहरालगत असणाऱ्या कर्नाळ- नांद्रे परिसरातील ओढ्यालगत काल रात्री बिबट्याचे दर्शन झाले. एका शेतामध्ये लपून बसलेल्या बिबट्यामुळे परिसरातील नागरिक भयभीत झाले आहेत. दरम्यान, ही माहिती मिळताच वनविभागाचे पथक तातडीने दाखल झाले. परिसरात शोध घेण्यात आला. रात्री उशारापर्यंत शोध सुरू होता.