राज्याचे कृषी मंत्री उद्या निपाणीत शेतकऱ्याच्या भेटीला

राज्याचे कृषी मंत्री बी. सी. पाटील हे मंगळवारी एक दिवस शेतकऱ्यांसोबत उपक्रमानिमित्त निपाणीत येणार आहे
राज्याचे कृषी मंत्री उद्या निपाणीत शेतकऱ्याच्या भेटीला
राज्याचे कृषी मंत्री उद्या निपाणीत शेतकऱ्याच्या भेटीला

निपाणी : राज्याचे कृषी मंत्री बी. सी. पाटील हे मंगळवारी (ता. 28) एक दिवस शेतकऱ्यांसोबत उपक्रमानिमित्त निपाणीत येणार आहेत. या दिवशी उपक्रमांतर्गत मंत्री पाटील, धर्मादाय वक्फ व हज मंत्री शशिकला जोल्ले, खासदार अण्णासाहेब जोल्ले यांच्या उपस्थितीत विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे.

सकाळी 8.30 वाजता भिवशी येथे ऊस पिकाबाबत प्रात्यक्षिक व शेतकऱ्यांसोबत संवाद कार्यक्रमात मंत्री पाटील सहभागी होतील. त्यानंतर 10.30 वाजता अक्कोळ येथील प्रवीण शाह यांच्या गोशाळेला भेट देऊन पाहणी करणार आहेत. 11.30 वाजता रावसाहेब फराळे यांच्या शेतात ऊसतोडणी यंत्राव्दारे ऊसतोडणीच्या प्रात्यक्षिक कार्यक्रमात ते सहभागी होतील. 12.15 वाजता गवाण येथील शिवानंद शांडगे यांच्या शेतात विविध ऊस पिकांच्या बियाणांसह शेततळ्याची पाहणी करतील.

राज्याचे कृषी मंत्री उद्या निपाणीत शेतकऱ्याच्या भेटीला
वरळी-कलानगर सोडून मुंबईच अस्तित्व शिवसेनेला मान्य आहे? - भाजपा

1.45 वाजता आडी येथील मल्लय्या डोंगरावर शेतकऱ्यांच्या पाल्यांना दिल्या जाणारया विद्यानिधी शिष्यवृत्तीबाबत शेतकऱ्यांसह त्यांच्या पाल्यांना माहिती देणार आहेत. 2.45 वाजता कुर्ली येथील संभाजी माने यांच्या सेंद्रीय गुळ निर्मिती प्रकल्पाला भेट देऊन शेतकरयांशी चर्चा करतील. सायंकाळी 4 वाजता निपाणीतील एपीएमसी आवारातील शेतकरी उत्पादक संस्थेचे उदघाटन करतील. 4.15 वाजता श्रीपेवाडी रोडवरील शिवशंकर जोल्ले पब्लिक शाळेच्या आवारात कृषी वस्तू प्रदर्शनाचे उदघाटन करून मुख्य कार्यक्रम होईल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com