ब्रेकिंग : कर्नाटकच्या दाेन बस महाराष्ट्रात जप्त

ब्रेकिंग : कर्नाटकच्या दाेन बस महाराष्ट्रात जप्त

सातारा : सातारा येथील पोवई नाक्यावर सन 2014 मध्ये कर्नाटक महामंडळाच्या बसखाली चिरडून दुचाकीवरील वडिल व चिमुकलीचा दुर्दैवी अंत झाला होता. या घटनेनंतर संबंधित कुटुृंब पूर्णपणे कोलमडून पडले होते. या कुटुंबाला नुकसान भरपाई देण्यास टाळाटाळ करणार्‍या कर्नाटक महामंडळाला जिल्हा न्यायालयाने भरपाई देण्याचा आदेश केला हाेता. त्याची पुर्तता न झाल्याने अखेर न्यायालयाच्या आदेशानूसार कर्नाटक महामंडळाच्या दोन बस सातारा येथे जप्त करण्यात आल्या आहेत.

सातार्‍यातील पोवई नाक्यावर 16 ऑगस्ट 2014 रोजी कर्नाटक महामंडळाच्या बसने (केए - 22 -1961) मोटरसायकल क्रमांक (एमएच - 12- एच- 6717) ला धडक दिली हाेती. या अपघातात रवींद्र तानाजी लावंड आणि त्यांची मुलगी श्रृती लावंड यांचा मृत्यू झाला. हा अपघात बसचालकाच्रा चुकीमुळे झाल्याचे सिद्ध होवून त्यास सातारा न्यायालयात एक वर्षाची शिक्षा झाली. तसेच रविंद्र लावंड आणि श्रृती लावंड यांच्या कुटुंबाला नुकसान भरपाईसाठी दोन अर्ज लावंड यांच्या वारसांनी केले. मूळचे खातगुण (ता. खटाव) रेथील रवींद्र लावंड हे पत्नी आणि मुलगी यांच्यासमवेत सातारा रेथे राहत होते व अभिजित इक्विपमेंट प्रायव्हेट लिमिटेड कंपनीमध्रे कामाला होते. त्यांचे आई-वडील वरस्कर असून गावीच राहतात. या भीषण अपघातामुळे लावंड कुटुंबावर गंभीर परिणाम झाला. घरचा कर्ता पुरुष दगावल्याने उपासमारीची वेळ आली.

लावंड यांच्या वारसदारांनी दाखल केलेल्या अर्जावर सन 2017 मध्ये निकाल लागला. त्यामध्ये नुकसान भरपाईची रक्कम देण्याचे आदेश झाले. परंतु, न्यायालयच्या आदेशाप्रमाणे रक्कम जमा न करता कर्नाटक राज्य महामंडळाने उच्च न्यायालय (मुंबई) येथे दाद मागितली. त्यावेळी काही अटीवर स्थगितीचा आदेश झाला. कर्नाटक राज्य मंडळाने सहा आठवड्यांच्रा आत सर्व रक्कम न्यायालयात जमा करावी व तसे न झाल्यास संबंधित आदेश आपोआप रद्द होईल, असे नमूद केले होते. तरीही कर्नाटक राज्य महामंडळाने आजपर्यंत कोणतीही प्रकारची रक्कम न्यायालयात भरली नाही. यासंदर्भात तडजोडीसाठी प्रस्ताव देण्यात आले, परंतु, त्याचीही दखल घेतली गेली नाही. त्यामुळे सातारा न्यायालयाने कर्नाटक राज्य महामंडळाच्या मालकीच्या बसेस जप्त कराव्यात व त्या विकून त्यातून अर्जदारांचे येणे असलेली 20 लाख 78 हजार 465 आणि नऊ लाख 59 हजार 257 रुपरे आणि काही व्याजाची रक्कम असे वसूल होऊन मिळावेत अर्ज करण्यात आला हाेता. त्यावर सातारा येथील मोटार अपघात प्राधिकरण सदस्य आणि जिल्हा न्यायाधीश खान यांनी अर्ज मंजूर करून एसटी बसेस जप्त करण्याचा आदेश केला.

वाचा : हिरो व्हायच्या नादात सिओने केले कऱ्हा़डचे वाटोळे

त्यानूसार बुधवारी (ता.4) कर्नाटक महामंडळाच्या एसटी बसेस जप्त करण्यात आल्या आहेत. याबाबतची माहिती रवींद्र लावंड यांचे वडील तानाजी लावंड, आई अलका लावंड, श्रीमती तेजश्री लावंड यांनी तसेच त्यांचे वकील अ‍ॅड. यशवंतराव आर. वाघ व सहकारी यांनी दिली.

हेही वाचा : ती बाेलवते पण आपण जायचे नाही

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com