esakal | आरटी-पीसीआर उल्लंघन प्रकरणी मांगूर फाटा येथे कारवाई
sakal

बोलून बातमी शोधा

आरटी-पीसीआर उल्लंघन प्रकरणी मांगूर फाटा येथे कारवाई

आरटी-पीसीआर उल्लंघन प्रकरणी मांगूर फाटा येथे कारवाई

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

सौंदलगा : कर्नाटकमध्ये प्रवेश करताना परराज्यातील प्रवाशांना आरटी-पीसीआर निगेटिव्ह प्रमाणपत्र बंधनकारक आहे. मात्र सौंदलगा हद्दीत मांगूर फाटा येथे लातूर येथील श्रेयस ट्रॅव्हल्सचे चालक, क्लिनर, मॅनेजर तसेच कुर्ली येथील वडाप चालक यांनी संगनमत करून प्रवाशांच्या आरटी-पीसीआर टेस्ट केल्याची खोटी माहिती देत कोविड नियंत्रण कायद्याचे उल्लंघन केले. त्यामुळे पाच जणांवर वाहनासह निपाणी ग्रामीण पोलिसांनी मंगळवारी (ता. १४) कारवाई केली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी, श्रेयस ट्रॅव्हल्सचे (एमएच ११ सीएच ६९५५) चालक वामन गोविंद सोनकांबळे (वय ५२, रा. हेर, ता. उदगिर. जि. लातूर), लहू शंकर लांडगे (वय २५, रा. सांगूपवाडी, जि. लातूर), क्लिनर योगेश शिवाजी कोनेरी (वय २१, रा. हुबळी) व वडाप (एमएच ०९ डीएम २५२२) वाहनाचा चालक नितीन कृष्णात गोडेप्पा (वय २७, कुर्ली, सध्या रा. आप्पाचीवाडी) हे कायद्याचे उल्लंघन करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार त्यांना ताब्यात घेण्यात आले आले.

हेही वाचा: धारावीच्या जान मोहम्मदचे 'दाऊद'शी जुने संबंध - ATS प्रमुख

ट्रॅव्हल्सच्या व्यवस्थापकावरही गुन्हा नोंदविण्यात आला आहे. या वाहनातून 9 जण प्रवास करत होते. पोलिसांनी कागदपत्रांची माहिती मागताच ती खोटी असल्याचे निदर्शनास आले. ताब्यात घेतलेल्या संशयितांवर कोरोना नियंत्रण कायदा कलम २६९, २७०, २७१, ३५३, ४२० अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास निपाणीचे मंडल पोलिस निरीक्षक संगमेश शिवयोगी यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामीण पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक अनिल कुंभार करत आहेत.

loading image
go to top