Grand Felicitation Ceremony for Retired Army Jawan Nagesh Dhale
esakal
नागेश ढाले यांच्या सेवानिवृत्तीचा बुदिहाळ गावात मोठ्या उत्साहात सत्कार झाला.
२२ वर्षांच्या सेवेत त्यांनी देशभरातील अनेक केंद्रांवर कामगिरी बजावली.
कार्यक्रमात गावकऱ्यांसह तरुण मंडळांचा मोठा सहभाग होता.
यमगर्णी (ता. २) : बुदिहाळ येथील जवान नागेश ढाले (Army Jawan Nagesh Dhale) यांच्या सेवानिवृत्ती निमित्त सोमवारी (ता. १) ग्रामस्थांकडून त्यांचा यथोचित सत्कार करण्यात आला. गावात आगमन होताच महिलांनी औक्षण करून स्वागत केले, तर ढाले दाम्पत्यांची गाडीतून भव्य मिरवणूक काढण्यात आली.