Siddaramaiah Former Chief minister of Karnataka
Siddaramaiah Former Chief minister of Karnataka

Vidhan Sabha 2019 : महाराष्ट्राला पाणी देण्याचे कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांचे आश्‍वासन खोटे

सांगली - जतला कर्नाटकचे पाणी देण्याबाबत कर्नाटकचे  मुख्यमंत्री येडीयुराप्पांनी दिलेले आश्‍वासन खोटे आहे. जतला कर्नाटकचे पाणी मिळालेच पाहिजे अशी आमची भूमिका आहे. परंतू फक्त येडीयुराप्पाच बोलत आहेत. मात्र महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस याबाबत का बोलत नाहीत? असा सवाल कर्नाटकचे काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी पत्रकार परिषदेत केला.

ते म्हणाले,""कर्नाटकात काँग्रेसला 38 टक्के तर भाजपला 36 टक्के मते मिळाली आहेत. भाजपला तिथे सर्वाधिक जागा मिळाल्या असल्या तरी तिथे काँग्रेसच मजबूत आहे. सत्ता गेल्यानंतरही काँग्रेसची ताकद कायम आहे. 15 जागांवर तिथे पोटनिवडणूक होणार आहे. त्यानंतर सर्वात जास्त काँग्रेसच्या जागा असतील. तसेच कर्नाटकात मध्यावधी निवडणुका होण्याची शक्‍यता जास्त आहे. भाजप सरकार खोटारडे आहे. ते खरे कधीच बोलत नाहीत. आजपर्यंत खोट्या आश्‍वासनावरच त्यांनी राजकारण केले आहे. जाहीरनाम्याची पूर्तता कधीच केली नाही. महाराष्ट्रातील निवडणुकीतही खऱ्या प्रश्‍नांपासून मतदारांचे लक्ष विचलित करून हिंदूत्व, 370, सर्जिकल स्ट्राईककडे लक्ष वेधले जात आहे. भावनात्मक गोष्टीवर दिशाभूल केली जात आहे.''

श्री. सिद्धरामय्या पुढे म्हणाले, ""मुख्यमंत्री येडीयुराप्पा यांनी
कर्नाटकचे पाणी जतला देणार म्हणतात. परंतू ते शक्‍य वाटत नाही. ते निव्वळ खोटे आश्‍वासन देत आहे. जतला पाणी जरूर मिळाले पाहिजे अशी आमची भूमिका आहे. परंतू केवळ येडीयुराप्पा बोलून उपयोग नाही. दोन्ही राज्यांनी एकत्र बसून त्याबाबत निर्णय घेतला पाहिजे. दोन्ही राज्यात भाजपची सत्ता आहे. परंतू येडीयुराप्पाच बोलत आहेत. मुख्यमंत्री फडणवीस काहीच बोलत नाहीत.''

ईडी, आयकरच्या धाडीबाबत विचारलेल्या प्रश्‍नांवर त्यांनी या धाडी राजकीय दबावातून असू नयेत. निव्वळ कायदेशीर धाडी असल्यातर काही हरकत नसल्याचे उत्तर दिले. ईव्हीएम वरील मतदान शंका घेण्यासारखे आहेत. त्यामुळे तांत्रिकदृष्ट्या बदल करणे शक्‍य असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत, उमेदवार पृथ्वीराज पाटील, आमदार रामहरी रूपनवर आदी उपस्थित होते.

बॅक वॉटरने पूर नाही-
महापुराबाबत ते म्हणाले, अलमट्टीच्या बॅक वॉटरमुळे महापूर येतो म्हणणे चुकीचे आहे. कोयना परिसरात झालेला जादा पाऊस आणि धरणातील पाण्याचा विसर्ग यामुळे महापूर आला होता.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News
www.esakal.com