esakal | पुन्हा कन्नडिगांची आगळीक ; विकास कामांवर कानडी फलक

बोलून बातमी शोधा

karnataka government English heading on development work

शासकिय कार्यालयावरील फलक, बसवरील फलक, सरकारी परिपत्रके केवळ कानडी भाषेतून देण्यात येत आहेत. त्यातच आता भरीर भर म्हणून स्मार्ट सिटी व्यवस्थापनाकडून सुरु असलेल्या विविध विकास कामांवर केवळ कानडी आणि इंग्रजी भाषेतील फलक लावण्यात येत आहेत.

पुन्हा कन्नडिगांची आगळीक ; विकास कामांवर कानडी फलक
sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मजगाव : बेळगावात मराठी भाषीकांची संख्या अधिक असून देखील कर्नाटक सरकार बेळगावावर आपला हक्‍क सांगण्याचा नेहमी केविलवाना प्रयत्न करीत आहे. येथील मराठीपण पुसून टाकण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारे प्रयत्न करण्यात येत आहेत.

हे पण वाचा - कोरोनाचा कोल्हापूरला असा हा फटका.... 

शासकिय कार्यालयावरील फलक, बसवरील फलक, सरकारी परिपत्रके केवळ कानडी भाषेतून देण्यात येत आहेत. त्यातच आता भरीर भर म्हणून स्मार्ट सिटी व्यवस्थापनाकडून सुरु असलेल्या विविध विकास कामांवर केवळ कानडी आणि इंग्रजी भाषेतील फलक लावण्यात येत आहेत. मजगावसह उपनगर व शहरात नव्याने उभारण्यात आलेल्या बसथांब्यावरील फलकावर मराठीचा उल्लेख टाळण्यात आला आहे. त्यामुळे मराठी भाषीकांतून नाराजी व्यक्‍त करण्यात येत आहे. 

हे पण वाचा - अर्थसंकल्प २०२० : अर्थसंकल्पात कोकणाला काय मिळाले ? वाचा.... 

महानगर पालिकेच्या व्याप्तीत येणाऱ्या मजगाव क्रॉसवर यापुर्वीच मजगावी असा उल्लेख असलेला कानडी फलक उभारण्यात आला आहे. मजगावचे नामकरण करण्यासाठी काही कानडी संघटनानी केलेल्या खटाटोपाबद्दल यापूर्वीच मराठी भाषीकांतून संताप व्यक्‍त करण्यात आला होता. मजगाव आणि परिसरात मराठी भाषीकांची संख्या मोठी आहे. मात्र, स्मार्ट सिटीतून मजगावला उभारण्यात आलेल्या बसथांब्यावर मराठीला डावलत केवळ कानडी आणि इंग्रजी भाषेतील फलक उभारण्यात आला आहे. त्यामुळे मराठी भाषीकांची गोची होत आहे. मध्यतंरी महापालिकेच्यावतीने शहरात ठिकठिकाणी तिन्ही भाषेतील माहिती फलक उभारण्यात आले होते. त्यामुळे रस्त्यांची नावे, चौक, उद्याने सर्व भाषीकांना समजणे सोपे झाले. त्याचप्रमाणे तिन्ही भाषेतील फलक स्मार्ट सिटी व्यवस्थापनाने देखील बसथांब्यावर लावावेत अशी मागणी करण्यात येत आहे. मजगावसह उपनगर आणि शहरातील नवीन बसथांब्यावर मराठीला स्थान देण्यात आले नसून केवळ कानडी आणि इंग्रजी भाषेतील फलक उभारण्यत आले आहेत. मात्र, यामुळे मराठी भाषीक प्रवाशांची अडचण निर्माण होत आहे.