करवीर पुरवठा कार्यालयातील पंटर लाचलुचपतच्या जाळ्यात 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 18 फेब्रुवारी 2019

कोल्हापूर - रेशनकार्डवरील नाव कमी करून स्वतंत्र रेशनकार्ड देण्यासाठी दोन हजारांची लाच स्वीकारताना करवीर पुरवठा कार्यालयातील पंटर जयंवत आबाजी तोडकर (रा. हनुमान गल्ली, बलिंगा) याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली. सायंकाळी करवीर पुरवठा कार्यालयात ही कारवाई झाली. 

भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे जेष्ठ कार्यकर्ते बाळू राऊ पाटील  (65 रा कंदलगावं) यांनी फिर्याद दिली होती. या बाबतची अधिक माहिती अशी, बाळू पाटील यांच्या विवाहित मुलगी राजश्री शिवाजी पिष्टे (30) या केर्ले येथे तिच्या सासू सासऱ्यासह राहतात. त्यांच्या पतीचे वर्षभरापूर्वी निधन झाले आहे. घरकुल योजनेचा लाभ घेण्यासाठी राजश्री यांना रेशनकार्डवरील नाव कमी करून स्वतंत्र रेशनकार्ड हवे होते. त्यासाठी पाटील यांनी करवीर पुरवठा कार्यालयाकडे कागदपत्रांसह काही दिवसापूर्वी अर्ज केला होता. मात्र सर्व कागदपत्रे जमा करून ही काम होत नव्हते. पाटील यांनी पुरवठा कार्यालयात संपर्क साधला असता  कार्यालयातील पंटर जयवंत तोडकर याने काम करून देण्यासाठी अडीच हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली.

याबाबत बाळू पाटील यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागात फिर्याद दिली होती. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केलेल्या पडताळणीत तोडकरने दोन हजार लाचेची मागणी केली. आज सायंकाळी लाचलुचपत विभागाने पुरवठा कार्यलयात सापळा रचून तोडकर याला लाच घेताना रंगेहाथ पकडले.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: karveer supply office agent arrested in bribe case