डिग्रजकरांनो पुनर्वसनाची तयारी ठेवा, समस्या सोडवू: ठाकरे

डिग्रजकरांनो पुनर्वसनाची तयारी ठेवा, समस्या सोडवू: ठाकरे

कसबेडिग्रज, मौजेडिग्रजात 40 वर्षानी आले मुख्यमंत्री ; ग्रामस्थांचा टाळ्यांचा कडकडाट

तुंग (सांगली) : जिल्ह्याच्या दौऱ्यावर असलेले मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM UddhavThackeray) यांनी मिरज तालुक्यातील कसबे डिग्रज व मौजे डिग्रज या कृष्णा काठावरील पूरग्रस्त गावांना भेटी दिल्या. येथील ग्रामपंचायत प्रशासनाकडून समस्या व मागण्या जाणून घेतल्या. यावेळी चर्चेदरम्यान वारंवार येणाऱ्या पुरामुळे सतत नुकसान होत असल्याने यावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी मुख्यमंत्री ठाकरे यांनी या गावातील लोकांची पुनर्वसनची मानसिकता असेल तर त्यासाठी आपण प्रयत्न करूया. अशी ग्वाही दिली. पुनर्वसन करण्याची जबाबदारी सरकार घेईल असे सांगितले .

Summary

कसबेडिग्रज, मौजेडिग्रजला 40 वर्षानी आले मुख्यमंत्री. उद्धव ठाकरे यांनी हात उंचावून नमस्कार करताच ग्रामस्थांनी टाळ्या वाजवून दिली दाद.

यावेळी कसबे डिग्रज, मौजे डिग्रज ग्रामपंचायतीने पूरामुळे झालेल्या नुकसानीचे स्वरूप नकाशाच्या माध्यमातून निदर्शनास आणून दिले. यावेळी कसबे डिग्रज ग्रामपंचायतसह विविध संस्थांनी आपल्या मागण्याचे निवेदन त्यांना दिले. यामध्ये गावातील रस्त्यांचा प्रश्न मार्गी लागावा. तसेच 2019 व 21 च्या महापुरामुळे पडझड झालेल्या घरांना घरकुल योजनेतून तात्काळ घरे बांधून आथवा घरकूल मिळावे. तसेच गावाची लोकसंख्या विचारात घेऊन गावामध्ये दहा बेडच्या प्राथमिक आरोग्य केंद्रास मंजुरी मिळावी. पुराच्या वेळी गावातून बाहेर पडण्यासाठी सांगली इस्लामपूर मार्गाला जोडाणारा पर्यायी रस्ता करावा. अशा मागण्यांचे निवेदन सरपंच किरण लोंढे,राष्ट्रवादीचे नेते जयवंत नलवडे यांच्या हस्ते देण्यात आले.

डिग्रजकरांनो पुनर्वसनाची तयारी ठेवा, समस्या सोडवू: ठाकरे
CM Sangli Visit : केंद्राने 'NDRF' चे निकष सुधारावेत; ठाकरे

मौजे डिग्रज येथील ग्रामपंचायतीच्या वतीने गावातून बाहेर पडण्यासाठी असलेल्या नांद्रे कवठ वाट रस्त्याची उंची वाढवण्यात यावी, तसेच बसवेश्वर मंदिर देवस्थानचा तीर्थक्षेत्र योजनेत समावेश व्हावा, पडझड झालेल्या घरांना घरकुल मंजूर होऊन मिळावीत. येथे पूनर्वसनच्या प्रश्नावर ग्रामस्थ तयार होतील पण 15/20 किलोमीटरहून येऊन शेती करणे शक्य होणार नाही. त्याऐवजी पिकाची नुकसानभरपाई व दोन अथवा तीनमजली घरे बांधण्यासाठी मदत मिळावी. इत्यादी मागणीचे निवेदन सरपंच गीतांजली इरकर, गावचे नेते उद्योजक भालचंद्र पाटील व ग्रामपंचायत प्रशासनाच्या वतीने देण्यात आले.दौऱ्यावेळी शिवसेनेचे हातकणंगलेचे खासदार धैर्यशील माने राज्यमंत्री विश्वजीत कदम, जिल्हाधिकारी डॉ.अभिजीत चौधरी, सांगली जिल्हा संपर्कप्रमुख नितीन बानगुडे पाटील जिल्ह्यातील विविध विभागाचे प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते.

संवादात आडथळा,मुख्यमंत्र्यांना पहाण्यासाठी गर्दी

कधी नव्हे ते कसबेडिग्रज, मौजेडिग्रज ला 40 वर्षानी मुख्यमंत्री येणार होते. याचे ग्रामस्थांना अप्रुप होते. त्यांना पाहण्यासाठी गर्दी झाली होती. परंतु कडक बंदोबस्तामुळे संवाद साधता न आल्याने हिरमोड झाला. त्यातूनही मुख्यमंत्र्यानी हात उंचावून नमस्कार करताच ग्रामस्थानी टाळ्या वाजवून दाद दिली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com