CM Sangli Visit : केंद्राने 'NDRF' चे निकष सुधारावेत; ठाकरे

वडनेरे समितीसह सर्व समित्यांचे अहवाल एकत्र करून योग्य तो आराखडा करण्यात येईल.
CM Sangli Visit : केंद्राने 'NDRF' चे निकष सुधारावेत; ठाकरे

सांगली : पूराच्या पाण्याचे व्यवस्थापन करणे महत्वाचे आहे. त्यासाठी तज्ज्ञांची समिती नेमली जाईल, अशी घोषणा मुख्यमंत्री उध्दव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी आज येथे पत्रकार परिषदेत व्यक्त केली. पूर नियंत्रणासाठी दुष्काळग्रस्त भागाकडे पाणी वळवण्याचा सूचनाही देण्यात आल्या आहेत. वडनेरे समितीसह (Wadnere Committee) सर्व समित्यांचे अहवाल एकत्र करून योग्य तो आराखडा करण्यात येईल. केंद्राने आता एनडीआरएफचे (NDRF) निकष सुधारावेत, व्यावसायिक, व्यापारी यांना विम्याची रक्कम महसूल विभागाच्या पंचनाम्यावर मिळावेत, असे निर्देश प्रशासनाला दिले आहेत. मुख्यमंत्री ठाकरे यांनी आज सांगली जिल्ह्यातील पूरभागातील गावांसह सांगलीतील पुरपट्ट्याची पाहणी केली. नागरिकांशी चर्चा आणि काही संघटनांची निवेदनेही स्विकारली. त्यांच्याबरोबर कृषी व सहकार राज्यमंत्री डॉ. विश्‍वजित कदम, राज्याचे मुख्य सचिव सिताराम कुंटे आदी उपस्थित होते.

Summary

पुरपट्यातील बांधकामे नाईलाजाने दूर करावी लागतील. आपत्तीग्रस्तांना तात्काळ मदत करणे सुरु झाले आहे.

मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले, महापूर आपत्तीची वारंवारता पाहिली तर त्यांचे स्वरूप भीषण होतेय. प्रचंड प्रमाणात पाऊस, दरडी खचताहेत, निसर्गासमोर हतबलता असते. पुराच्या पाण्यामुळे पूल वाहून गेले, घाट रस्ते खचले. नदी पात्रातल्या पूर रेषेची अंमलबजावणी होत नसेल तर त्यांना काय अर्थ आहे. पूर पट्यात अतिक्रमणे झाली आहेत. काही ठिकाणी वस्त्यांचे पुनर्वसन करावे लागेल. त्यात दरडग्रस्त ठिकाणांचाही समावेश असेल. पुरपट्यातील बांधकामे देखील नाईलाजाने दूर करावी लागतील. दोन गोष्टींवर आपल्याला काम करावे लागेल. आपत्तीग्रस्तांना तात्काळ मदत करणे सुरु झाले आहे.

CM Sangli Visit : केंद्राने 'NDRF' चे निकष सुधारावेत; ठाकरे
सांगलीत संभाजी भिडेंनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट

सांगलीत प्रशासनाला नागरिकांनी चांगले सहकार्य केले आहे. पूरपट्ट्यातील काही लाख लोकांचे स्थलांतर झाले. जीव वाचले आहेत. जनावरांचेही स्थलांतर झाले. यापुढे याची पुनरावृत्ती टाळण्यासाठी कायमस्वरूपी तोडगा काढणे अत्यंत महत्वाचे आहे. पूर व्यवस्थापन, दरडी का कोसळतात या अनुषंगाने उपाय शोधण्यात येतील. यापुढे विकास कामे करताना होणारा फायदा व नंतर निसर्ग, पर्यावरण या अनुषंगाने भविष्यातील होणारा तोटा याचा विचार करावा लागेल. आम्ही मागणी केली आहे. केंद्राने आता एनडीआरएफचे निकष सुधारावेत, व्यावसायिक, व्यापारी यांना विम्याची रक्कम महसूल विभागाच्या पंचनाम्यावर मिळावी. सहा ही जिल्हे पूरस्थिती पूर्वी कोरोनाशी लढताहेत. सांगली परिसरात चाचणी वाढावा असे निर्देश प्रशासनाला दिले आहेत. नागरिकांचे जीव वाचविणे माझ्या दृष्टीने महत्वाचे आहे.

राज्यात आज १२५० ते १३०० टन ऑक्सिजन आपण दररोज उत्पादन करतो. पण मध्यंतरी ऑक्सिजनचा इतका तुटवडा झाला. सर्वाधिक १८०० टन ऑक्सिजन लागली. अन्य राज्यातून आयात करावी लागली. पुढची जी लाट आहे त्यात केंद्राने देखील आपल्याला आदेश दिले आहेत. या संभाव्य लाटेत दुपटीपेक्षा जास्त म्हणजे ३६०० टनापेक्षा अधिक ऑक्सिजन लागेल. मला विनंती करायची आहे कि प्रत्येकाने बाहेर पडताना मास्क घालावा. रुग्ण वाढ कमी होत नाहीत तिथे दुकानांच्या वेळांवर बंधने राहतील. इतर ठिकाणी दुकानांच्या वेळा रात्री ८ पर्यंत वाढवल्या जातील. मुंबई लोकलच्या बाबतीत आपण लगेच निर्णय घेत नाही आहोत. कोरोना टाळण्यासाठी सर्व ठिकाणच्या कार्यालय प्रमुखांना कामाच्या वेळांची विभागणी करावी. वर्क फ्रॉम होमचे नियोजन करावे. आरोग्याचे नियम पाळून सुरक्षितरित्या उत्पादन कसे करता येईल याचा विचार करावा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com