
Sangli Crime:
कासेगाव : येथे अनोळखी महिला व पुरुषाने संगनमत करून वृद्ध महिलेची फसवणूक केल्याची घटना घडली होती. यात वृद्धेकडील ४९ हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने लंपास केले होते. राकेश यंकाप्पा गोंधळी (वय ३३, व्यवसाय पायपुसणी विक्रेता), दुर्गवा गंगाप्पा कंडले (४७, व्यवसाय मजुरी) दोघेही रा. तहसीलदार प्लॉट निपाणी, ता. निपाणी, जि. बेळगाव अशी चोरट्यांची नावे आहेत. त्यांच्याकडून एकूण ९४ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.