पाच हजार शेतकरी कंपन्यांतून एकत्र

विकास जाधव
मंगळवार, 6 फेब्रुवारी 2018

काशीळ - शेतकरी ते ग्राहक या उपक्रमांतर्गत सातारा जिल्ह्यात ११ शेतकरी कंपन्या स्थापन करण्यात आल्या आहेत. या शेतकरी कंपन्यांच्या माध्यमातून जिल्ह्यातील सुमारे पाच हजार शेतकरी एकत्र आलेले आहेत. त्यामुळे ग्राहकांना रास्त दरात शेतीमाल तर शेतकऱ्यांच्या शेतीमालास वाजवी किंमत मिळण्यास मदत होऊ लागली आहे. 

शेतीमालाला रास्त बाजारभाव मिळण्यासाठी शासनाने महाराष्ट्र स्पर्धाक्षम कृषी विकास प्रकल्पांतर्गत शेतकरी कंपन्या स्थापन करण्याचा निर्णय घेतला होता. जिल्ह्यामध्ये २०१३ मध्ये शेतकरी कंपन्या स्थापन करण्यास सुरवात झाली.

तीन वर्षांत शेतकरी कंपन्या स्थापन करून त्या सक्षम करण्यासाठी शासनातर्फे आर्थिक मदत केली जाणार आहे. जिल्ह्यामध्ये आजपर्यंत ११ शेतकरी कंपन्यांची स्थापना करण्यात आली आहे. तत्कालीन कृषी पणन तज्ज्ञ सायली महाडिक यांनी कंपन्या स्थापण्यासाठी विशेष प्रयत्न केले होते.

यामधील तीन शेतकरी कंपन्या चांगल्या प्रमाणात सुरू झाल्या असून, उर्वरित कंपन्याची गती येण्यासाठी आत्मा व एमएसीपीच्या माध्यमातून प्रयत्न केले जात आहेत. या कंपन्यांच्या व्यवसाय वृद्धीसाठी प्रत्येक वर्षी खरेदीदार विक्रेता संमेलनाचे आयोजन करण्यात येते. यातून अनेक करार झाल्यामुळे कंपन्यांना गती येण्यास मदत झाली आहे. केडंबे येथील वेण्णा व्हॅली शेतकरी कंपनीकडून स्ट्रॉबेरीची प्रतवारी, पॅकिंग करून थेट विक्री केली जात आहे. फरांदवाडी येथील कृषी क्रांती या शेतकरी कंपनीकडून धान्याची प्रतवारी तर गिरवी येथील गोपाल कृष्ण शेतकरी कंपनीकडून डाळिंब विक्री व भाजीपाला पॅकिंग करून विक्री केली जात आहे.

उर्वरित कंपन्यांनी गती घेणे गरजेचे
जिल्ह्यात ११ पैकी तीन कंपन्या अग्रेसर झालेल्या आहेत. उर्वरित आठ शेतकरी कंपन्यांनी पाहिजे तेवढी गती घेतलेली नाही. कंपन्यांच्या माध्यमातून शेतकरी मोठ्या प्रमाणात संघटित होत आहेत. या संघटित शेतकऱ्यांना दिशा देण्यासाठी सर्वच कंपन्यांच्या संचालक तसेच कृषी विभागाकडून अग्रेसर होण्याची गरज आहे. सर्व कंपन्या कार्यरत झाल्यामुळे शेतकऱ्यांचा शेतमालास चांगला दर मिळण्यास मदत होणार आहे.

Web Title: kashil news satara news farmer company agriculture goods