esakal | महाराष्ट्रात सापडला बहामनी कालीन शिलालेख ; काय लिहलयं यात?
sakal

बोलून बातमी शोधा

महाराष्ट्रात सापडला बहामनी कालीन शिलालेख ; काय लिहलयं यात?

महाराष्ट्रात सापडला बहामनी कालीन शिलालेख ; काय लिहलयं यात?

sakal_logo
By
टीम ई सकाळ

मिरज : तालुक्यातील कवलापूर येथे ग्रामदैवत सिद्धेश्वर मंदिरात बहामनी काळातील ( १४९१ मधील शिलालेख (inscribe) मिरज इतिहास संशोधन मंडळाचे (history research board) अभ्यासक मानसिंगराव कुमठेकर आणि प्रा. गौतम काटकर यांना मिळाला आहे. भिवाजी नामक व्यक्तीने हे सिद्धेश्वर मंदिर बांधल्याचा उल्लेख शिलालेखात आहे. (Bahamani petrograph found in कवलापूर) संपूर्ण मराठीत असलेला कालदृष्ट्या सांगली जिल्ह्यातील पहिला लेख आहे. या लेखामुळे सांगली जिल्ह्याच्या बहामनी काळातील धार्मिक घडामोडींवर प्रकाश पडणार आहे.

कवलापूरचे ग्रामदैवत असलेल्या श्री सिद्धेश्वराचे मंदिर (siddheshwar temple kavlapur) हे ऐतिहासिक मंदिर आहे. त्याची दरवर्षी यात्रा भरते. या मंदिरात प्रदक्षिणा मार्गावर भिंतीत जमिनीलगत एक शिलालेख आहे. गावातील पाच ऐतिहासिक शिलालेखांचा (historical inscrib) अभ्यास मिरज इतिहास संशोधन मंडळाचे अभ्यासक मानसिंगराव कुमठेकर आणि प्रा. गौतम काटकर करीत आहेत. याच अभ्यासादरम्यान हा लेख त्यांना मिळाला. शिलालेखात पाच ओळी आहेत. लेख संपूर्णपणे मराठी भाषेत आहे. बहामनी कालीन मराठी भाषेची वैशिष्ट्ये या लेखात दिसतात. लेखाची भाषा ही संपूर्ण मराठी आहे. मोडी लिपीतील अक्षरांची काही वळणे यात आहेत. शके १४१३ म्हणजे सन १४९१ च्या चैत्र महिन्यात लेख कोरला आहे.

हेही वाचा: शिराळा वनविभागातील वनपालासह दोघे लाचलुचपतच्या जाळ्यात

लेखाच्या प्रारंभी मध्यभागी शिवलिंग कोरले आहे. दोन्ही बाजूला सूर्य-चंद्र आणि गाईचे चित्र कोरले आहे. शेवटी नमस्कार मुद्रेतील एका व्यक्तिचे चित्र आडव्या बाजूस आहे. कवलापुरात देवगिरीचा यादव राजा कृष्णदेव याचा सन १२५७ चा संस्कृत-मराठी मिश्रित लेख यापूर्वी आढळून आला आहे. मात्र सिद्धेश्वर मंदिरात सध्या मिळालेल्या या लेखाची भाषा पूर्णपणे मराठी आहे. जिल्ह्यात आजवर उपलब्ध झालेल्या शिलालेखांपैकी संपूर्ण मराठी भाषा असणारा कालदृष्ट्या पहिला शिलालेख आहे. बहामनी कालीन मराठी भाषेची वैशिष्ट्ये जाणून घेण्यासाठी हा लेख उपयुक्त ठरणार आहे. या लेखाच्या अभ्यासासाठी मंदिराचे विश्वस्त डॉ. विवेक पाटील, दर्शन गुरव, प्रमोद लाड यांचे सहकार्य लाभले.

हे आहे शिलालेखात

सिद्धेश्वर मंदिरात सापडलेल्या या शिलालेखात, ‘स्वस्ति श्री शेकू १४१३ वर्षे विरोधिकृतुनाम सवछरे चैत सुध द्वादसी गुरुवारू ते दीसी भीवाजी बीन तानजी बहिरवदासु तेणे भीक्षा मागोनु देऊळ बाधळे’ असे नमूद केलेले आहे. यात भीवजी स्वतःला बहिरवदास म्हणजे भैरवाचा दास म्हणवून घेतो. ज्या मंदिरात हा लेख आढळून आला. ते सिद्धेश्‍वर मंदिरही काळभैरवाचेच आहे. भीवाजीने भिक्षा मागून म्हणजे देणगी गोळा करून हे मंदिर बांधले असावे.

हेही वाचा: Video : ऐश्वर्या नारकर यांच्या मुलाचा अफलातून डान्स पाहिलात का?