एक महिन्यांसाठी राजकीय नामुष्की टळली; कवलापूर ग्रामपंचायतीला मिळाला, काय झाले वाचा

विष्णू मोहिते
Friday, 17 July 2020

कवलापूर (जि. सांगली)येथील ग्रामपंचायतीच्या बरखास्तीला ग्रामीण विकास मंत्री हसन मुश्रीम यांनी स्थगिती दिली.

कवलापूर (जि. सांगली) ः येथील ग्रामपंचायतीच्या बरखास्तीला ग्रामीण विकास मंत्री हसन मुश्रीम यांनी स्थगिती दिली. ग्रामपंचायतीतील अनियमितता आणि नियमब्राह्य खर्चाच्या कारणावरून विभागीय आयुक्तांनी चार जुलै रोजी बरखास्तीचे आदेश दिले होते.

जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्याकडे तंटामुक्तीचे अध्यक्ष भानुदास पाटील यांनी पाठपुरावा केल्यामुळे स्थगिती मिळाली. अव्वर सचिव नीला रानडे यांनी बरखास्तीला स्थगितीचा निर्णय दिला आहे. ग्रामीण विकास मंत्र्यांकडे सुनावणी होणार आहे. ग्रामपंचायतीची मुदत पुढील महिन्यांत संपणार आहे. स्थगितीमुळे राजकीय नामुष्की टळली. 

तंटामुक्ती अध्यक्ष श्री. पाटील यांनी पालकमंत्री श्री. पाटील यांच्याकडे पाठपुरावा केला. केले एकाने आणि ते एकावर निस्तरायची वेळ आली हे त्यांना पटवून दिले. पालकमंत्री श्री. पाटील यांनी ग्रामीण विकास मंत्री मुश्रीफ यांच्याशी संपर्क साधला. ग्रामपंचायत बरखास्तीचा निर्णयाला मंगळवारी स्थगिती मिळाली. 

विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी प्रशासक नियुक्तीचे आदेश दिले होते. सत्तेच्या शेवटच्या टप्प्यात सरपंच, उपसरपंचांसह 17 सदस्यांना या गंभीर कारवाईला सामोरे जावे लागले. हे सदस्य सन 2015 मध्ये झालेल्या निवडणुकीत निवडून आले. त्यांचा कालावधी पुढील महिन्यात संपणार आहे. अमित माळी दीड वर्ष, अनुसया तांदळे दीड वर्ष, अमित माळी दीड वर्ष सरपंच होते.

शेवटच्या काही महिन्यांसाठी सत्ताबदल होऊन भाजपचे प्रकाश हाक्के सरपंच झाले आहेत. हा कालावधी कमी असला तरी कवलापूरसारख्या मोठ्या गावातील ग्रामपंचायतीच्या कारभाऱ्यांना बसलेला हा हादरा होता. विशेष म्हणजे ग्रामपंचायत बरखास्तीने जिल्ह्यात नाचक्की झाली होती. 

संपादन - युवराज यादव


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Kavalapur village Panchayat's dismissal Postponed