
Sub-Inspector Dadasaheb Khot found dead near Kavthe Mahankal temple; investigation underway.
Sakal
मिरज: सिद्धेवाडी (ता. मिरज) येथील श्रेणी पोलिस उपनिरीक्षक दादासाहेब महादेव खोत (वय ५५) हे कवठेमहांकाळमधील युवावाणी चौका परिसरातील मंदिराजवळ शनिवारी (ता. ११) रात्री बेशुद्धावस्थेत आढळून आले. नागरिकांनी तत्काळ त्यांना जवळच्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी तपासून त्यांना मृत घोषित केले.