कवठेएकंद आतषबाजीची होणार मराठी ‘डॉक्‍युमेंटरी’

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 4 ऑक्टोबर 2017

कवठेएकंद - महाराष्ट्राची शिवकाशी म्हणून ओळख असलेल्या कवठेएकंदच्या आतषबाजीचा उत्सव व ग्रामदैवत श्री सिद्धराज महाराजांचा पालखी सोहळा नुकताच झाला. त्याची पहिल्यांदाच मराठी डॉक्‍युमेंटरी तयार करण्यात येणार आहे. सांगलीतील ड्रीम-बॉक्‍स प्रॉडक्‍शन निर्मिती करणार आहे.

तासगाव तालुक्‍यातील कवठेएकंदची पारंपरिक व  लक्षवेधी आतषबाजीची झलक व महाराष्ट्रची शिवकाशी अशी ओळख या सादरीकरणातून रसिकांपर्यंत पोहोचण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहे.

पारंपरिक दारूकामाबरोबर दसऱ्यानिमित्त ग्रामदैवत श्री सिद्धराजाच्या पालखी सोहळ्यासाठी होणारी पारंपरिक आतषबाजीचे चित्रीकरण करण्यात आले आहे.

नवरात्रीत नऊ दिवस चित्रीकरण
ग्रामस्थ व मंदिराचे पुजाऱ्यांनी सहकार्य केले. यासाठी दीपक पेटकर, अमित कणीरे, नितीन लोहार, अनिल पाटील, मनोज बंडगर, सुनील शिंदे, सचिन पवार, मनोज जाधव, अनिरुद्ध पाटील, दीपक मेगेंने, निखिल लोहार, विशाल बुर्ले, अभिजित कुंभार परिश्रम घेत आहेत.

Web Title: kavtheekand sangli news marathi documentary on kavtheekand fire show