‘कवठेमहांकाळ’चे सभापती कोळेकरांना नारळ

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 22 एप्रिल 2017

उपनिबंधकांच्या आदेशानंतर कारवाई - सत्ताधारी कदम, खासदार पाटील गटाला धक्का
सांगली - सांगली कृषी उत्पन्न बाजार  समितीच्या कवठेमहांकाळ दुय्यम बाजार आवाराचे सभापती दादासाहेब कोळेकर यांची निवड रद्द करून अखेर प्रशासनाने त्यांना नारळ दिला. सत्ताधारी पतंगराव कदम आणि खासदार संजय पाटील गटाला माजी मंत्री अजितराव घोरपडे गटाने धक्का दिला आहे. या शिवाय घोरपडे गटाने संचालिका सुगलाबाई बिराजदार यांचे संचालक पद रद्द करणे आणि नव्याने बाजार समितीसाठी उमदीतील जागा खरेदीलाही आव्हान दिले आहे. या  दोन्ही प्रकरणांची चौकशी सुरू आहे. 

श्री. कोळेकर यांची स्वीकृत सदस्य म्हणून निवड झाली होती. सत्ताधारी गटाला खिंडीत गाठण्याचे  निवडणुकीवेळी सत्तेत सहभागी घोरपडे गटाकडून सुरू आहे. 

सांगली बाजार समिती सभापती निवडीवेळी सत्ताधारी पतंगराव कदम गटाला खासदार संजय पाटील गटाने  मदत केली. त्यातून उतराई व्हावे म्हणून दुय्यम बाजारच्या सभापतिपदी १७ जानेवारीला कोळेकरांची निवड झाली होती. ती नियमबाह्य असल्याची तक्रार  माजी सभापती भारत डुबुले यांनी केली. जिल्हा सहकार उपनिबंधक प्रकाश अष्टेकर यांनी पणन संचालकांकडून मार्गदर्शन मागवले. सहसंचालक यशवंत गिरी यांनी उपसमितीचे सभापती म्हणून कोळेकरांची नियुक्ती अवैध असल्याचे ११ एप्रिलला स्पष्ट केले. त्यानंतर उपनिबंधकांनी श्री. कोळेकर यांची निवड अवैध असल्याचे बाजार समितीला कळवले. श्री. कोळेकर  यांना सभापती पदावरून काढून टाकल्याचे कळवले.  पणन सहसंचालक श्री. गिरी यांनी आदेशात म्हटले आहे, की कृषी उत्पन्न खरेदी-विक्री अधिनियम १९६३ मधील कलम तीस व मंजूर उपविधी ४५ (१) नुसार केलेल्या उपसमित्या कायद्यानुसार गठित केलेल्या नाहीत. मूळ  बारा उपसमित्या अधिनियमातील तरतुदीप्रमाणे मंजूर आहेत. बारा उपसमित्यांत स्वीकृत सदस्यांना घेता येते, परंतु संचालकांने प्राधिकृत केलेल्या अधिकाऱ्याची मान्यता आवश्‍यक असते. तसा ठराव समितीत केला पाहिजे. स्वीकृत संचालक नेमणुकीसंदर्भात कायदा कलमाचे पालन करणे बंधनकारक आहे.

शासन नियुक्त संचालकांस उपसमितीचा प्रमुख अथवा सदस्य म्हणून नेमल्यास नियमाचा भंग होतो. शासन नियुक्त सदस्यांस मत मांडता येते, सूचक किंवा अनुमोदक होता येत  नाही.

कवठेमहांकाळ दुय्यम बाजार समितीच्या विषय बाजार समिती अंतर्गत विषय आहे. त्याला एवढे महत्त्व देण्याचे कारण नाही. सांगली बाजार समितीचा व्याप मोठा आहे.
- प्रशांत शेजाळ, सभापती, सांगली बाजार समिती

बाजार समितीतील बेकायदा नियुक्‍त्या अन्‌  कामकाजाला चाप लावला आहे. ही सुरवात आहे. यापुढेही जागा खरेदी, सुगलाबाई बिरादार यांचे संचालकपद रद्द या निर्णयाला आव्हान दिले आहे. पुढे काय होतेय ते पाहावे लागेल.
 -भारत डुबुले, माजी सभापती

Web Title: kavthemahankal chairman dadasaheb kolekar