अध्यक्षपदाच्या दावेदार इच्छुकांचे कवलापूरकडे लक्ष

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 4 फेब्रुवारी 2017

कवलापूर - निवडणूक अर्ज दाखल करण्यास तीन दिवसांचा कालावधी उरल्याने सर्वच ठिकाणी कोणत्या पक्षांकडून कोण लढणार याबद्दल मोठी उत्सुकता शिगेला पोचली आहे. झेडपीचे अध्यक्षपद खुल्या गटासाठी राखीव असल्याने कवलापूर (खुला) गटावर अनेकांची नजर आहे. एक विद्यमान इच्छुक आहे. काँग्रेस, भाजप, राष्ट्रवादी, शिवसेना यांच्याच प्रमुख लढत आहे.

कवलापूर - निवडणूक अर्ज दाखल करण्यास तीन दिवसांचा कालावधी उरल्याने सर्वच ठिकाणी कोणत्या पक्षांकडून कोण लढणार याबद्दल मोठी उत्सुकता शिगेला पोचली आहे. झेडपीचे अध्यक्षपद खुल्या गटासाठी राखीव असल्याने कवलापूर (खुला) गटावर अनेकांची नजर आहे. एक विद्यमान इच्छुक आहे. काँग्रेस, भाजप, राष्ट्रवादी, शिवसेना यांच्याच प्रमुख लढत आहे.

अपवाद वगळता येथे काँग्रेसचे वर्चस्व राहिले. दादा गटात फाटाफूट झाली, तर फरक पडेल. यापूर्वी मदन पाटील राष्ट्रवादीत गेल्यामुळे राष्ट्रवादीचा विजय झाला. यंदा विशाल पाटील यांची भूमिका महत्त्वाची आहे. काँग्रेससमोर भाजपचे आव्हान असेल. मात्र स्थानिकच उमेदवार हवा असा आग्रह आहे. गेल्यावेळी भाजपचा निसटता पराभव झाला. त्यावेळी गावच्या सत्तेत भाजप होता. विशेष म्हणजे भाजपकडून दोघे स्थानिक इच्छुक आहेत. अध्यक्षपद खुले असल्यामुळे बाहेरील  इच्छुकांची चाचपणी सुरू झालीय. राष्ट्रवादी, शिवसेनेकडूनही जोरदार हालचाली सुरू आहेत. या गटावर एका विद्यमान सदस्यांचे प्रयत्न सुरू आहेत. गेली साडेचार वर्षे स्वतःच्या मतदार संघाकडे नव्हे झेडपीच्या सभांत केवळ सहीसाठी फिरकणाऱ्यांकडून पुन्हा  फिल्डिंग लावली जात आहे. निवडणुकीपुरता विचार करून येणाऱ्यांना कवलापूरकरांनी यापूर्वी नाकारल्याचा इतिहास आहे. यंदा काय होणार हे मात्र पहावे लागेल.   

काँग्रेसकडून निवासबापू पाटील यांची उमेदवारी अंतिम मानली जाते. तंटामुक्तीचे अध्यक्ष भानुदास पाटील, भाजपकडून मनोज शिंदे, विजय पाटील, पंचायत समिती सदस्य सतीश नीळकंठ इच्छुक आहेत. माधवनगरचे झेडपी सदस्य शिवाजी डोंगरे यांनीही भाजपकडे उमेदवारीसाठी कंबर खचली आहे. भाजपची उसन्या उमेदवाराला कितपत साथ मिळणार?, याचा वरिष्ठ नेते विचार करून निर्णय घेतील.

कवलापूर गणातून सतीश कोरे यांच्या नावाची चर्चा  आहे. बिसूर गण ओबीसी महिलांसाठी आरक्षित आहे. येथून काँग्रेसकडून पूनम कोळी, सुवर्णा कोळी, शिवसेनेकडून नीळकंठ कुटुंबातील महिला उमेदवार असू शकते.

आयात उमेदवारांचा फज्जा...
खुल्या गटामुळे इच्छुकांची संख्या खूप आहे. अध्यक्षपदासाठी बाहेरील कोण उतरणार का?, याची जोरदार चर्चा आहे. कवलापूरकरांनी आतापर्यंत  बाहेरच्या उमेदवारांना केव्हाच साथ दिलेली नाही असा इतिहास आहे.

Web Title: kawalapur zp election