माजी उपमहापौरांना अटक होण्याची शक्‍यता

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 10 जुलै 2018

नगर - केडगाव दुहेरी हत्याकांडाच्या गुन्ह्यात माजी उपमहापौर सुवर्णा कोतकर याही अडचणीत येण्याची चिन्हे आहेत. सुवर्णा यांचे पती माजी महापौर संदीप कोतकर व दीर औदुंबर कोतकर यांच्यासह सुवर्णा कोतकर यांचाही गुन्ह्याचा कट रचण्यात सहभाग असल्याचे "सीआयडी'ने न्यायालयात दाखल केलेल्या दोषारोपपत्रात नमूद केले आहे.

कॉंग्रेसचा माजी शहर-जिल्हाध्यक्ष भानुदास कोतकर याचा दोषारोपपत्रात पूर्वीच समावेश झाला आहे. तांत्रिक तपासावरून कटाची साखळी समोर आली असून, सुवर्णा कोतकर यांना कधीही अटक होण्याची शक्‍यता "सीआयडी'च्या गोटातून वर्तविण्यात येत आहे.

Web Title: Kedgaon Double Murder case Suvarna Kotkar Crime