शिक्षक कंटाळले गटबाजीला ; लढाई सुरुच ठेवणार

शिक्षक कंटाळले गटबाजीला ; लढाई सुरुच ठेवणार

निमसोड (जि. सातारा) : वडूज येथील अक्षता मंगल कार्यालयात खटाव तालुका प्राथमिक शिक्षक समितीचा जाहीर मेळावा झाला. या मेळाव्यात आगामी काळात संघटनेची मजबूत बांधणी करण्याचा निर्धार करण्यात आला. या मेळाव्यात शिक्षक संघाचे तालुकाध्यक्ष विद्यासागर माने यांच्यासह सुमारे 20 कार्यकत्यांनी समितीमध्ये जाहीर प्रवेश केला. या प्रवेशामुळे शिक्षक संघास खिंडार पडल्याची चर्चा शिक्षक वर्गात आहे.

समितीचे राज्याध्यक्ष उदय शिंदे, जिल्हाध्यक्ष शंकरराव देवरे यांच्या उपस्थितीत हा मेळावा झाला. यावेळी राजन कोरेगांवकर, प्रदिप कदम, संतोष घोडके, संचालक किरण यादव, चंद्रकांत मोरे, श्री. शेवाळे, बँकेचे माजी उपाध्यक्ष कांतआण्णा फडतरे, विश्वंभर रणनवरे, विठ्ठलराव फडतरे, शशिकांत बागल, संजय तिडके, अरुण खाडे यांची प्रमुख उपस्थिती होती.

नक्की वाचा -  हो...त्याने केले क्षणांत 50 हजार परत

यावेळी बोलताना श्री. शिंदे म्हणाले, यापूर्वी खटाव तालुका हा समितीचा बालेकिल्ला होता. अपवाद वगळता या तालुक्याने शिक्षक बँक व इतर संघटना पातळीवरील लढाईत नेहमीच समितीला भक्कम पाठबळ दिले आहे. काही तांत्रिक अडचणीमुळे मागच्या खेपेस निवडणूकीत एक जागा कमी झाली. मात्र आत्ता नवीन होतकरु कार्यकत्यांनी संघटनेची मजबूत बांधणी करण्याचे काम हाती घेतले आहे. त्यामुळे निश्चितपणे भविष्यकाळात परिवर्तन होईल.

या मेळाव्यात संघाचे अध्यक्ष श्री. माने यांच्यासह प्रसाद महामुनी, दत्तात्रय सावंत, संग्राम गोसावी, नंदराज हडस, संदिप चंदनशिवे, हणमंत जाधव, सतिश खाडे, बाबासाहेब केदार, प्रभाकर गायकवाड, आनंदराव खाडे, सुभाष सलगर, अनिता माने, योगिता गोसावी, सिमा चंदनशिवे, आशा खाडे, स्वाती जाधव आदिंनी समितीमध्ये जाहीर प्रवेश केला.

जरुर वाचा -  दहिवडी : तीच्या प्रामाणिकपणास पोलिसांचा सलाम

तालुकाध्यक्ष अर्जुन यमगर, सरचिटणीस नवनाथ जाधव यांनी स्वागत केले. श्री. रणनवरे यांनी प्रास्ताविक केले. आबासाहेब जाधव यांनी सुत्रसंचालन केले. कार्यक्रमास उपाध्यक्ष शिवाजी लखापते, माजी सरचिटणीस विजय गोरे, किरण गोडसे, पोपट माळवे, उमेश पाटील, गोविंद माळवे, सुनिल खाडे, सौ. काळे, सौ. जाधव, सौ. माने आदिंसह शेकडो शिक्षक उपस्थित होते.

गटबाजीला कंटाळून प्रवेश

यावेळी बोलताना सागर माने म्हणाले, गेली अनेक वर्षे आपण शिक्षण संघामध्ये प्रामाणिक काम केले. अडचणीच्या काळात बँकेची निवडणूकही लढविली. मात्र अलिकडच्या काळात संघटनेत मोठ्या प्रमाणावर गटबाजी वाढली आहे. या गटबाजीमुळे तळागळात काम करणार्‍या प्रामाणिक कार्यकत्यांचे खच्चीकरण होत आहे. या प्रकारास कंटाळून आपण शिक्षक समितीमध्ये जाहीर प्रवेश केला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com