..अन् अपहरण झालेली मुलगी अखेर घरी परतली

crime-logo.jpg
crime-logo.jpg

मंगळवेढा :  दोन दिवसांपूर्वी अपहरण केलेल्या सतरा वर्षाच्या अल्पवयीन मुलीस अपहरणकर्त्यांनी तिच्या गावाच्या हद्दीजवळ आणून सोडले. रडत घराकडे आलेल्या मुलीच्या अपहरणकर्त्यावर कारवाई करावी या मागणीसाठी ग्रामस्थांनी पोलिस स्टेशनकडे धाव घेतली. महिना दिनाच्या उत्साहाला या घटनेने गालबोट लागले.

याबाबत या घटनेची सविस्तर हकीकत अशी की, मंगळवेढा तालुक्याच्या दक्षिण भागातील सांगली जिल्ह्याच्या सिमेलगत तलावाच्या पाण्यावर ऊस बागायत क्षेत्र असलेल्या गावाच्या सीमेवर हे पिडीत आई व भावासह राहत असून वडील मयत झाले आहेत. या अल्पवयीन मुलीस जत तालुक्यातील एका मुलाने फूस लावून दोन दिवसापूर्वी अपहरण केले. या अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यामूळे ग्रामस्थांमधून या प्रकाराबद्दल तीव्र संताप व्यक्त केला जात असताना पोलिसांचा वेगात तपास सुरु होता. अपहरणकर्त्याला गावातील एका महिलेनेच मदत केल्याचा संशय व्यक्त केला गेला. त्यादृष्टीने तपास सुरू करताच सदर प्रकरण वाढले असून या मुलीस आणून सोडण्याची माहिती फोनवरून दिली. त्यानंतर अपहरणकर्त्यानी आणून सोडल्याची चर्चा सुरू झाली.

अपहरत मुलीने कच्च्या रस्त्याने घरी घेऊन झालेल्या प्रकाराची माहिती ग्रामस्थांना दिली. ग्रामस्थांनी या आरोपीवर कारवाई करावी या मागणीसाठी पोलिस स्टेशनकडे दाद मागितली आहे. सिमावर्ती असलेल्या दक्षिण भागात अलिकडच्या काळात गुन्हेगारी वाढ झाली असून या भागात प्रास्तावित असलेला पोलिस स्टेशनच्या प्रश्न प्रलंबित ठेवल्याने गुन्हेगारी वाढत आहे. समाजातील साक्षरता येऊनही गैरकृत्याकडे वळत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com