महाराष्ट्रातील पाच जणांची ‘किलीमांजारो’वर चढाई

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 31 जानेवारी 2019

सातारा - नांदवळचे सुपुत्र व नवी मुंबई दलातील पोलिसासह महाराष्ट्रातील पाच जणांनी आफ्रिकेतील टांझानिया येथील किलीमांजारो या शिखरावर यशस्वी चढाई केली. विशेष म्हणजे या सर्वांनी २६ जानेवारीला हे शिखर सर केले. महाराष्ट्राच्या अस्मितेचे प्रतीक भगवा, तिरंगा व महाराष्ट्र पोलिस ध्वज फडकावून जगातील चौथ्या क्रमांकाच्या शिखरावर प्रजासत्ताक दिन साजरा केला. 

‘किलीमांजारो’ हा आफ्रिका खंडातील सर्वांत उंच पर्वत आहे. तुषार पवार हे सातारा जिल्ह्यातील नांदवळचे असून नवी मुंबई पोलिस दलात आहेत. या मोहिमेत अकोल्याचे धीरज कळसाईत, पिंपरी-चिंचवडचे साई कवडे व पिंपरी-चिंचवड अग्निशमन दलाचे जवान अनिल वाघ यांनी भाग घेतला. या मोहिमेचे नेतृत्व अनिल वाघ व प्रियांका गाडे यांनी केले.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: kilimanjaro summit Success Motivation