देवीच्या मुखापर्यंत सूर्यकिरणे पोचणार का ? 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 11 नोव्हेंबर 2016

कोल्हापूर - श्री महालक्ष्मी मंदिरातील किरणोत्सव सोहळ्याच्या दुसऱ्या दिवशी आज मावळतीच्या प्रखर सूर्यकिरणांनी मूर्तीच्या कमरेपर्यंत प्रवेश केला आणि त्यानंतर त्याची प्रखरता कमी होत ती मूर्तीच्या गळ्यापर्यंत पोचली. परंपरेनुसार आणि शास्त्रीय आधारानुसार किरणोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी किरणे मूर्तीच्या कमरेपर्यंत पोचणे अपेक्षित होते. ती अपेक्षा पूर्ण झाली. मात्र किरणोत्सव मार्गातील अडथळ्यांची शर्यत अजूनही कायम असून उद्या (ता. 11) किरणोत्सवाच्या अखेरच्या दिवशी किरणे देवीच्या मुखापर्यंत पोचणार का, याची उत्सुकता आता आहे. 

सायंकाळी चार वाजून चाळीस मिनिटांनी सूर्यकिरणे महाद्वारातून आत आली. त्यानंतर पाच वाजून चार मिनिटांनी ती गरूड मंडपात पोचली. त्यानंतर अर्ध्या तासांनी पाच वाजून 36 मिनिटांनी ती मंदिरातील खजिना चौकापर्यंत पोचली. तेथून पुढे सात मिनिटांनी किरणांनी गर्भकुटीत प्रवेश केला. पाच वाजून 45 मिनिटांनी चरणस्पर्श करून ती पुढच्या काही मिनिटांत कमरेपर्यंत पोचली. त्यानंतर तीन मिनिटे किरणांचे अस्तित्व राहिले. मात्र किरणांची प्रखरता कमी झाली. 

अडथळेच अडथळे 
किरणोत्सव मार्गातील अडथळ्यांबरोबरच किरणोत्सव सोहळा पाहण्यासाठी मंदिरात थांबून राहणाऱ्या भाविकांतील काही अतिउत्साही भाविकांचाही मोठा अडथळा या सोहळ्यात ठरतो. किरणांनी मूर्तीवर प्रवेश करताच काही मंडळी उभी राहतात. त्यामुळेही किरणोत्सव पूर्ण क्षमतेने होत नसल्याचे तज्ज्ञांनी सांगितले.

Web Title: kirnotsav mahalakshmi temple

टॅग्स